प्रसिद्ध साहित्यिका प्रा.डॉ.मंगल सांगळे यांची वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य साहित्य आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष पदी निवड
श्री.सुरेश सांगळे. पत्रकार दक्ष पोलीस वार्ता न्युज.सिन्नर ग्रामीण.
सिन्नर (कणकोरी).दिनांक-३१/०७/२०२५ सिन्नर तालुक्यातील कणकोरी गावची कन्या प्राध्यापिका डॉ. मंगल कचरू सांगळे यांनी साहित्य क्षेत्रात अनमोल कामगिरी करत असताना गेल्या अनेक वर्षांपासून तरुप्रीत प्रकल्पाच्या माध्यमातून निसर्ग संवर्धनासाठी हजारो वृक्ष लागवड व बीजारोपण करत उजाड माळरानावर हिरवळ फुलविण्याचे कार्य निरपेक्ष भावनेने आजपर्यंत करणाऱ्या, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सिन्नरच्या कोषाध्यक्ष, तिफण त्रैमासिक सोशल मिडिया राज्य प्रतिनिधी, पत्रकार तसेच क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्नर येथे मराठी विभाग व वाङ्मय मंडळ प्रमुख व राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी या पदावर कार्यरत असणाऱ्या तसेच भारत रत्न मदर तेरेसा गोल्ड मेडल अवॉर्ड २०२० या राष्ट्रीय पुरस्कारासोबतच १३ राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त साहित्यिका, प्रसिद्ध व्याख्यात्या, वृक्ष संवर्धनासाठी सुरू केलेल्या तरुप्रीत प्रकल्पाच्या संचालिका प्रा. डॉ. मंगल सांगळे सिन्नर यांची वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य साहित्य आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
वंजारी महासंघ महाराष्ट्र साहित्य आघाडीने सन २०२२ मध्ये राज्यातील वंजारी समाजाचे पहिले राज्यस्तरीय एकदिवसीय मराठी साहित्य संमेलन मराठा शिक्षण प्रसारक मंडळाचे रावसाहेब थोरात सभागृह येथे आयोजित केले होते. त्या मध्ये राज्यातील नामांकित साहित्यिक एका मंचावर आले होते. सदर परंपरा कायम रहावी म्हणून द्विवार्षिक साहित्य संमेलन घेण्याचा निर्णय साहित्य आघाडीने घेतला आणि सन २०२४ मध्ये अहिल्यानगर या ठिकाणी वंजारी समाजाचे दुसरे राज्यस्तरीय एकदिवसीय मराठी साहित्य संमेलन संपन्न झाले. या संमेलनातून सामाजिक समतेचा विचार राज्यभर पोहचला आहे.सन २०२६ मध्ये तिसरे राज्यस्तरीय एकदिवसीय मराठी साहित्य संमेलन संपन्न होणार आहे. त्या अनुषंगाने अयोजन नियोजन आणि साहित्य अघाडीचे मजबूत संघटन राज्यपातळीवर निर्माण व्हावे म्हणून वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष तथा विचारवंत साहित्यिक, लेखक, अध्यात्मिक मार्गदर्शक गणेश खाडे,वंजारी समाजाच्या पहिल्या राज्यस्तरीय संमेलनाचे अध्यक्ष प्रा. वा. ना. आंधळे दुसऱ्या संमेलनाच्या अध्यक्ष प्रा. डॉ. संगिता घुगे साहित्य आघाडीच्या माजी प्रदेशाध्यक्ष रेखा शेळके संखे यांनी नाशिक जिल्ह्यात साहित्य क्षेत्राला नवी झळाळी मिळवून दिली.
साहित्यिका प्रा. डॉ. मंगल सांगळे यांची निवड वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष पदी केली आहे. सदर निवडीबद्दल राज्यभरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
