अफू या अंमली पदार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या आरोपीवर पालघर पोलीसची कार्यवाही अफू या अंमली पदार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या आरोपीवर पालघर पोलीस दलाकडून कारवाई १११. ४२०किलोग्रॅम दोडाचूरा तीन नंबर प्लेट शह क्रेटा कार जप्त पोलीस अधीक्षक पालघर श्री यतीश देशमुख यांनी पालघर जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करणे बाबत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखा पालघर यांना सक्त सूचना दिल्या आहेत मोखाडा पोलीस ठाणे हद्दीमध्ये दिनांक २१/०७/२५रोजी ०२/ वाजता सुमारास पो हवा /९८४शशिकांत भोये व पो अं /१५१५ बापू नागरे नेमणूक मोखाडा पोलीस ठाणे. रात्रीगस्त करीत असतांना मोखाडा त्रंबक रोड ने क्रेटा कार क्र MP09 CZ 6609ही भरधाववेगाने जात असतांना आढळून आली सदर कारचा नमूद पोलीस अंमलदार यांना संशय आल्याने त्यांनी पाठलाग केला मौजे चिंचूतार गावाचे जवळ नमूद कार चालक हा कारची चावी काढून अंधाराचा फायदा घेऊन कार सोडून पळून गेला सदर कारमध्ये चेक केले असतांना त्या मध्ये ७,८०,३४०/रुपये किंमतीचा एकूण १११, ४२०किलोग्रॅम वजनाचा अफू वनस्पतीचे सुकळेला दोडाचा चुरा व HR36,AC,2410 MH05,DS, 2526 या क्रमांकच्या बनावट नंबर प्लेट व ८००,०००/रुपये किंमतीची क्रेटा कार असे एकूण १५, ८०, ३४०/रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात येऊन त्या बाबत मोखाडा पोलीस ठाणे येथे गु. र. नं ११९/२०२५एन. डी. पी एस.१९८५ चे कलम १५(क ) व ८(क )बी. एन. एस. कलम ३१८ मो वा का कलम १८४प्रमाणे दि २१/०७/२०२५रोजी अज्ञात आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आले सदर ची कारवाही ही श्री यतिश देशमुख पोलीस अधीक्षक पालघर श्री विनायक नरळे अप्पर पोलीस अधीक्षक पालघर श्री गणपत पिंगळे उप विभागीय पोलीस अधिकारी जव्हार विभाग यांचे मार्गदर्शनाखाली श्री प्रेमनाथ ढोले पो उपनिरी /श्रीकांत वहिफळे पो हवा ५६२/ भास्कर कोठारी पो हवा /भोये /पो हवा /कामडी पो अं /बापू नागरे पो अं /पंकज गुजर सर्व नेमणूक मोखाडा पोलीस ठाणे यांनी केलेली आहे
