१५ चोरीच्या मोटार सायकलसह ४आरोपीनांअटक गुन्हेशाखा युनिट क. १ ची कामगिरी. प्रतिनिधी आदिल मामा शेख नासिक मोटार सायकल चोरी करणा-या टोळीतील ०३ सराईत गुन्हेगार व ०१ विधी संघर्षीत बालक यांच्या ताब्यातुन एकुण १०,४०,००० रूपये किंमतीच्या १५ चोरीच्या मोटार सायकलसह आरोपी गुन्हेशाखा युनिट क्र१ची कामगिरी
नाशिक शहरात मोटार सायकल चोरीचे प्रमाण वाढले असल्याने मोटार सायकल चोरी करणा-या इसमांचा शोध घेवून त्यांचेवर कठोर कारवाई करणे बाबत मा. पोलीस आयुक्त नाशिक शहर श्री. संदीप कर्णीक यांनी आदेशित केले होते, त्या अनुषगांने मा. पोलीस उपायुक्त श्री. किरणकुमार चव्हाण, मा. सहा. पोलीस आयुक्त श्री. संदीप मिटके यांनी गुन्हे शाखेचे पथक तयार करून त्यांना सदर आरोपीतांचा शोध घेण्याबाबत सुचना केल्या
त्या अनुषंगाने गुन्हेशाखा युनिट क्रमांक १ कडील अधिकारी व अंमलदार असे सरकारवाडा पोलीस ठाणे कडील । गु र नं २०४/२०२५ भा. न्या. से. कलम ३०३ ( २ ) प्रमाणे दाखल गुन्हयाचा समांतर तपास करीत असतांना पो अंम ९९ गोरक्ष साबळे, पो अंम २०२१ राम बर्डे, पो अंम २०६९ विलास चारोस्कर व पोअंम १४०५ आप्पा पानवळ यांना त्यांचे गुप्त बातमीद्वारा मार्फत बातमी मिळाली की, सदर आरोपी हे चोरीची होंडा कंपनीची काळया रंगाची युनिकॉर्न मोटार सायकलवर बसुन निलगिरी बाग, छ. संभाजीनगर रोड, पंचवटी, नाशिक परीसरात येणार असल्याची खात्रीशिर बातमी मिळाली, सदर ची बातमी गुन्हे शाखा युनिट १ चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. मधुकर कड यांना देवुन त्यांनी पो उ वि चेतन श्रीवंत, पो हवा.महेश साळुंके, पो हवा. रविंद्र आढाव, पो हवा.ऊत्तम पवार, पो हवा. देविदास ठाकरे, पोअं विलास चारोस्कर, पोअं.गोरक्ष साबळे, पोअं.राम बर्डे, पोअं. आप्पा पानवळ, पोअं.राहुल पालखेडे, पोअं नितीन जगताप यांचे पथक तयार करून त्यांना मार्गदर्शन करून रवाना केले नमुद पथकाने निलगिरी बाग, छ. संभाजीनगर रोड, पंचवटी, नाशिक येथे सापळा लावला असता मिळालेल्या बातमी नुसार इसम नामे १) सायम उर्फ देवा मिलींद गरूड वय २१ राहणार आमदार मळा, कच्चरापट्टी जवळ, माऊली चाळ, ओझर, ता. निफाड, जि. नाशिक, २) साहिल आझाद शेख वय २१ वर्षे राहणार दहाच्या मैलाच्या पुढे, टिळकनगर कॉलेजच्या बाजूला, भगतसिंग नगर, ओझर, ता. निफाड, जि. नाशिक यांना ताब्यात घेवुन त्यांच्या ताब्यातुन ६०,०००/-रुपये किंमतीची चोरीची काळया रंगाची युनिकॉर्न मोटार सायकल ताब्यात घेतली. तसेच आरोपीतांकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी व त्याचे साथीदार नाशिक शहर व नाशिक ग्रामीण भागातुन एकुण १५ मोटार सायकली चोरी करून त्या विधीसंघर्षित बालक व खेडगाव येथील विकास बन्सीलाल कुमावत वय २३ वर्षे राहगार ब्राम्हण गल्ली, खेडगाव. ता. दिंडोरी, जि. नाशिक यांच्याकडे विक्री करीता दिले असल्याचे सांगितल्याने सदर इसमांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडुन ९,८०,०००/-रूपये किंमतीच्या एकूण १४ मोटार सायकली मिळून आल्या सदर तपास नासिक गुन्हे शाखा क्र १करत आहे
