रेल्वे डाक सेवेची एपीटी प्रणाली मंगळवारपासून कार्यान्वित होणार प्रतिनिधी बाबूजी शेख नासिक. नाशिक रोड रेल डाक सेवा विभागात एपीटी आप्लिकेशन प्रणाली मंगळवारपासून कार्यान्वित होणार आहे डाक विभागाने डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल म्हणून ही सुधारित प्रणाली सुरू करणार आहे. नव्या प्रणालीच्या अंमलबजावणी साठी 19 ते 21 जुलै 2025 या कालावधीत जुनी प्रणाली अद्यावत करण्याचे काम केले जाणार आहे त्यामुळे रेल डाक सेवा नाशिक रोड अंतर्गत सार्वजनिक व्यवहार तीन दिवस बंद राहणार आहेत.तरी ग्राहकांनी सहकार्य करावे असे आवाहन उप अभिलेख अधिकारी आर.एम.खैरे यांनी केले आहे
