हरित कुंभातून पर्यावरण संवर्धनाचा संकल्प काळाची गरज खा श्री भास्कर भगरे सर यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी सनी गोसावी पिंपळगाव
पिंपळगाव बसवंत पिंपळगाव बसवंत येथील मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेच्या कर्मवीर गणपत दादा मोरे जनता विद्यालय, आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल, अभिनव बाल विकास मंदिर पिंपळगाव बसवंत महाराष्ट्र शासन सामाजिक वनीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हरित कुंभ या संकल्पनेतून
माझा कुंभ माझी जबाबदारी, माझा वृक्ष माझी जबाबदारी या उपक्रमाच्या माध्यमातून वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी दिंडोरी लोकसभा मतदार संघाचे खासदार मा श्री भास्कर भगरे सर मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष श्री विश्वासराव मोरे साहेब यांच्या हस्ते विद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. खासदार भगरे सर यांनी आपल्या मार्गदर्शनातून पर्यावरणाचे संवर्धनासाठी हरित कुंभ सारख्या उपक्रमाच्या माध्यमातून वृक्षारोपण करणे झाडांची निगा राखणे, माझा वृक्ष माझी जबाबदारी या माध्यमातून सामाजिक दायित्व म्हणून आपण सर्वांनी वृक्षांची संवर्धन करणे गरजेचे आहे .या कार्यक्रमाप्रसंगी
श्री एन एम गांगुर्डे (वन परिमंडल अधिकारी सामाजिक वनीकरण निफाड)
श्रीम के डी पाईकराव (वनरक्षक सामाजिक वनीकरण निफाड )
मा.श्री जयराम मोरे
स्कूल कमिटी अध्यक्ष
कर्मवीर गणपत दादा मोरे जनता विद्यालय
मा. श्री संदीप भवर
स्कूल कमिटी अध्यक्ष
आदर्श इंग्लिश मिडीयम स्कूल, तीनही ज्ञान संकुलाचे स्कूल कमिटी सदस्य,
जनता विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय डेर्ले सर आदर्श इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका शिल्पा धारराव मॅडम, अभिनव बाल विकास मंदिर च्या मुख्याध्यापिका स्वप्नाली जाधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री जगदीश कुशारे यांनी, फलक लेखन कलाशिक्षक श्री अनिल शिरसाठ यांनी केले. या कार्यक्रमाप्रसंगी तीनही ज्ञान संकुलाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तशेच विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
