ख्रिश्चन समाजाच्या समस्यांसाठी जोसेफ अण्णा मलबार यांनी घेतली शरद पवारांची भेट…
. प्रतिनिधी गोपाळ डी भोसले धुळे
ख्रिश्चन समाजाच्या विविध प्रश्न व समस्या साठी आज जोसेफ अण्णा मलबारी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मुंबई येथे शरदचंद्र पवार साहेब, सुप्रियाताई सुळे, रोहित दादा पवार व इतर प्रमुख नेत्यांची भेट घेतली. ख्रिश्चन समाजावर होणारे अन्याय गोपीचंद पडळकर यांचे वादग्रस्त वक्तव्य व समाजाच्या इतर समस्या विषयी सविस्तर यावेळी चर्चा करण्यात आली.
यावेळी जोसेफ मलबारी यांनी सांगितले की, महाराष्ट्रामध्ये लाखोंच्या संख्येने ख्रिस्ती बांधव राहत आहे. ख्रिस्ती बांधव हे भगवान येशू ख्रिस्त यांच्या शिकवणी नुसार मानवता व माणुसकी या शिकवणीवर जगत आहे. ख्रिस्ती समाजाचा भारतीय संविधानावर विश्वास असून समाज कायद्याचे काटेकोर पालन करते. परंतु काही दिवसांपासून ख्रिस्ती धर्माच्या लोकांवर व प्रार्थनास्थळावर हल्ले व अन्याय अत्याचार होत आहे. ख्रिश्चन समाजाविषयी मोठ्या प्रमाणावर गैरसमज पसरून चितावणीखोर वक्तव्य केले जात आहे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिस्ती समाजाविषयी व ख्रिश्चन समाजाच्या धर्मगुरू विषयी चितावणीखोर वक्तव्य केले आहे. यामुळे विविध जाती धर्मामध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यामुळे समाजामध्ये मोठ्या स्वरूपात नाराजी आहे.
ख्रिश्चन समाज हा सेक्युलर विचारधाराचा आहे. त्यानिमित्ताने ख्रिश्चन समाजावरील अन्याय, अत्याचार प्रार्थना स्थळ, चर्च वरील हल्ले तसेच आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याच्या विरोधामध्ये धुळे जिल्ह्यातील ख्रिश्चन समाजाने दिनांक 23 जुलै 2025 रोजी साक्री येथे भव्य मोर्चाचे नियोजन केले आहे. सदर मोर्चामध्ये जवळपास 50 हजार ख्रिश्चन बांधवसहभागी होणार आहेत.
या मोर्चाला आपण प्रमुख वक्ते, प्रमुख अतिथी, मार्गदर्शक म्हणून सदर मोर्चाला उपस्थिती राहावे असे निमंत्रण जोसेफ अण्णा मलबार यांनी दिले.
