हरीत कुंभ अंतर्गत कणकोरी येथे वृक्षारोपण.
श्री.सुरेश सांगळे.
दक्ष पोलिस वार्ता न्यूज़. प्रतिनिधी सिन्नर ग्रामीण.
सिन्नर. (कणकोरी), दिनांक,17/07/2025. तालुक्यातील कणकोरी येथे हरीत कुंभ अंतर्गत वृक्षारोपण हा कार्यक्रम राबविण्यात आला. हा कार्यक्रम संपुर्ण नाशिक जिल्ह्यात राबविण्यात आला. कणकोरी ग्रामपंचायत परिसर,तलाठी कार्यालयासमोर, कणकेश्वर महाराज मंदिर परिसर या सर्व ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.भविष्यात वृक्ष लागवडी मुळे पावसाचे प्रमाण वाढून, हवा आनखी शुद्ध होणार असल्याचे यावेळी सरपंच सौ.योगीता रामनाथ सांगळे यांनी सांगितले.तसेच वृक्षारोपण का करावे याचे महत्व पोलिस पाटील सौ.सुनिता विनायक बुचकूल यांनी ग्रामस्थांना समजावून सांगितले. तसेच या कार्यक्रमा प्रसंगी माजी उपसरपंच श्री. रामनाथ पुंजा सांगळे,सरपंच सौ.योगीता रामनाथ सांगळे.उपसरपंच सुरेश झुंबर थोरात, पोलीस पाटील.सौ.सुनिता विनायक बुचकूल.ग्रामसेवक योगेश सोनवने, विनायक बुचकूल,ग्रामपंचायत कर्मचारी राजू आहिरे,रोहित बुचकूल.तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
