ब्रम्हानंद न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे शिक्षक पालक मेळावा संपन्न.
श्री. सुरेश सांगळे.
प्रतिनिधी सिन्नर ग्रामीण.
सिन्नर (दोडी बुद्रुक),दिनांक-12/07/2025 तालुक्यातील दोडी बुद्रुक येथील ब्रम्हानंद न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे सन 2025 या नवीन शैक्षणिक वर्षातील शिक्षक पालक मेळावा उत्साहात पार पडला.
या मेळाव्यासाठी कणकोरी, मानोरी,निर्हाळे,मर्हळ, सुरेगाव,दोडी खु,दोडी बु,माळवाडी, तास,नळवाडी,नांदुरशिंगोटे,इतर परिसरातील पालक उपस्थित होते. तसेच पालक मेळाव्याचे आयोजन दिनांक, 12/07/2025 रोजी सकाळी 11:00 वाजता केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री. सोनवने सर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच या कार्यक्रमासाठी सुत्रसंचालन शेळके. एल.एन. या सरांनी अतिशय उत्कृष्ट केल्याचे दिसले.तसेच इयत्ता दहावी चे वर्ग शिक्षक राजेंद्र शिंदे सर यांनी उत्कृष्ट असे मार्गदर्शन केले. तसेच राजेंद्र परदेशी सर यांनी पालकांच्या प्रश्नांचे समाधान कारक निवारण केले.तसेच मुख्याध्यापक सोनवणे सर यांनी अनुसुचीत जाती व जमाती,ओबीसी, अशा विद्यार्थी व विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती चा कसा फायदा होईल याची माहिती पालकांना दिली .तसेच मुलांना मोबाईल चा वापर विनाकारण करुन देऊ नका अशा सुचनाही सोनवणे सर यांनी पालकांना दिल्या. तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी आभ्यासाचा सराव कसा करावा या सुचना पण पालकांना दिल्या. तसेच खालील प्रमाणे शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते.
दराडे व्हि.टी.रमेश हिले,तांबे एस.एम.,संगारे सर,गीते मॅडम, डोळे मॅडम,साबळे मॅडम,शिंदे मॅडम, दराडे व्हि टी सर, सांगळे एस.टी.सर,शिंदे मॅडम,शेळके मॅडम, गांगुर्डे सर, तसेच भारत केदार, शंकरराव आव्हाड, बारकू कांगणे, तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
मेळावा संपन्न झाल्यानंतर पालकांसाठी चहापानाचे आयोजन करण्यात आले होते.
