निमोण, तळेगाव भागाला ओव्हर फ्लो चे पाणी संजिवनी देणार
प्रतिनिधी राजेंद्र घुगे- द.पो.वार्ता नासिक
*निमोण -तळेगाव भागाला काही अंशी संजीवनी असणारे भोजापुर धरण तीन-चार दिवसापासून ओव्हर फ्लो झालेले असून सद्यस्थितीमध्ये सांडव्यावरून सुमारे एक हजार१००० क्युसेक्स इतका पाणी विसर्ग वाहत आहे आणि आज सोमवार दिनांक ०७/०७/२०२५ रोजी सकाळी ठीक(७.००वा.) सात वाजता धरणामधून अंदाजे 80 क्युसेक्स इतका पाणी विसर्ग कालव्यात सोडण्यात आलेला आहे व टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढविण्यात येणार आहे. पुढील कालावधीमध्ये पडणाऱ्या पावसामुळे धरण सातत्याने पूर्णपणे भरलेले
राहणार असून सांडव्यावरून सतत पाणी विसर्ग सुरू राहणार आहे .त्यामुळे कालवा देखील पूर्ण क्षमतेने सुरू ठेवून जलसंपदा विभाग, नाशिक यांनी सिन्नर तालुक्यासह संगमनेर तालुक्यातील निमोण -तळेगाव परिसरातील सुमारे पंधरा गावांमधील गावतळे, पाझर तलाव ,दगडी/काँक्रीट साठवण बंधारे,ल.पा.तलाव पूर पाण्याने भरून द्यावेत व भोजापुर पूरचारी चा विसर्ग पूर्ण क्षमतेने तळेगाव दिघे (तिगाव माथ्यापर्यंत) पोहोचविण्याची कार्यवाही करावी
अशी माहिती
इंजि हरिश्चंद्र चकोर यांनी दिली
