गणेश बत्तासे / प्रतिनिधी – दक्ष पोलिस वार्ता , कोपरगांव

कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील पोलीस दुरश्रेत्रामध्ये यंदाच्या वर्षी गणेशोत्सव काळात मंडळांनी सामाजिक उपक्रम हाती घेऊन सामाजिक सलोखा जपण्याचे काम करावे, असे आवाहन कोपरगाव पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी केले.कोळपेवाडी येथील पोलीस दूरक्षेत्रामध्ये आज रोजी शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. पुढे ते म्हणाले, शासनाचे सर्व नियम पाळून मंडळांनी गणेश उत्सव साजरा करायचा आहे. डॉल्बीला फाटा देऊन त्यातील उरणारा खर्च हा गावात सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे. जेणे करून गावात होणाऱ्या चोरीला आळा बसेल. तसेच प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.गेली दोन वर्षे कोरोनाच्या सावटाखाली गणेशोत्सव अतिशय साधेपणाने साजरे करण्यात आले. यावर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आनंदात साजरे करा असेही पोलीस निरीक्षक मा श्री दौलतराव जाधव साहेब म्हणाले.
शासनाने यावर्षी सर्वच निर्बंध शिथिल केल्याने गणपती बाप्पाचे आगमन धुमधडाक्यात होणार आहे. गणेश मूर्तीची विटंबना होणार नाही याची दक्षता घ्यावी, विसर्जन प्रसंगी मिरवणूक काढावयाची असल्यास तसेच नदीवर गणपती विसर्जन करायचे असल्यास अगोदर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. यामुळे होणाऱ्या विपरीत घटनांना आळा बसेल. एक गाव एक गणपती राबवणेही गरजेचे असून कायदा व सुव्यवस्था राखावी, होणाऱ्या गणेश मंडळात कुणी मद्यपान करून आढळल्यास त्याची गय केली जाणार नाही. यावेळी सुरेगाव, कोळपेवाडी,वेळापूर,चास, हांडेवाडी,शहाजापूर,मढी,देर्डे,गवांमधील गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष व सचिव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता
संपर्क : +919822817037 / +919822117037

