नाशिकमधील अवैध वेश्या व्यवसायाविरोधात युवाशक्ती जनसेनेचे धडक पाऊल
नाशिक.प्रतिनिधी आकाश आहेर
नाशिक शहरातील CBS सिग्नल ते त्र्यंबक नाका सिग्नल दरम्यान सुरू असलेल्या अवैध वेश्या व्यवसायाविरोधात आता जनतेचा आवाज बुलंद होऊ लागला आहे. या गंभीर सामाजिक प्रश्नावर लक्ष वेधत युवाशक्ती जनसेना, महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मा. गृहराज्य, महसूल, अन्न व ग्रामविकास राज्यमंत्री मा. ना. श्री योगेशदादा रामदासभाई कदम यांच्याकडे अधिकृत निवेदन सादर करण्यात आले.
या निवेदनाद्वारे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आकाश रामदास आहेर यांनी ठामपणे मागणी केली की,
या परिसरात चालणारा अवैध व्यवसाय समाजाच्या नैतिक आणि सुरक्षिततेवर घाला आहे. यामुळे परिसरातील नागरिक, विद्यार्थी, महिला आणि वृद्धांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या व्यवसायामागील सूत्रधारांवर कठोर कारवाई होणे अत्यावश्यक आहे.
युवाशक्ती जनसेनेने प्रशासनाकडे पुढील मागण्या स्पष्टपणे मांडल्या:
अवैध वेश्या व्यवसाय तात्काळ बंद करण्यात यावा
गुन्हेगारांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी
पोलीस गस्त वाढवून परिसरातील सुरक्षाव्यवस्था बळकट करावी
या निवेदनाची दखल घेत शासनाने लवकरात लवकर कार्यवाही करावी, अशी सर्वसामान्य नाशिककरांची अपेक्षा आहे
आकाश रामदास आहेर
संस्थापक अध्यक्ष — युवाशक्ती जनसेना, महाराष्ट्र राज्य
अध्यक्ष — युवाशक्ती फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य
