*नाशिकरोड सोमाणी उद्यान परिसरातील मार्ग वन वे करा – नाशिक शहर युवक काँग्रेस*
नाशिक प्रतिनिधी : माजिद खान
नाशिकरोड विभागातील वाढती बाजार पेठ मुळे मोठ्या प्रमाणात गायकवाड मळा, सोमाणी उद्यान, बिटको मस्जिद, जयराम हॉस्पिटल जवळील मार्गांवर खूप गर्दी होऊ लागली आहे या मार्गांवर खाऊ गल्ली, कपड्यांचे दुकाने, भांड्यांची दुकानें आदी याच मार्गांवर असल्यामुळे हा भाग अत्यंत वरदळीचा झाला आहे आणि यामुळे मोठ्या प्रमाणात येथे ट्रॅफिक होऊ लागली आहे यामुळे अनेक वेळा येथे वादही निर्माण होतात येथील रहिवासी असणाऱ्या नागरिकांना मनस्ताप होतो आणि
म्हणून आज नाशिकपूर्व विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने परिवहन विभाग नाशिक (RTO) शेळके मॅडम यांना निवेदन सादर करून गायकवाड मळा, सोमाणी उद्यान, बिटको मस्जिद आणि जयराम हॉस्पिटल जवळील मार्ग वन वे करावे व याठिकाणी कायमस्वरूपी पोलिस कर्मचारी उभे करावे अशी मागणी करण्यात आली.
यावेळी नासिकपुर्व विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष जावेद पठाण, अल्पसंख्यांक काँग्रेसचे मा.अध्यक्ष मोबीन पठाण, जिल्हा अनुसूचित काँग्रेसचे उपाध्यक्ष सुभाष मामा हिरे,जेष्ठ नेते शेरखान पठाण, विधानसभा उपाध्यक्ष बंटी दासवाणी, अल्पसंख्यांक काँग्रेसचे शहर पदाधिकारी तन्वीर शेख, विधानसभा महासचिव किशन दुशिंग, जेष्ठ नेते सुभाष पाईकराव, विधानसभा उपाध्यक्ष अझरोद्दीन शेख, विधानसभा उपाध्यक्ष सुनील शिंदे आदी उपस्थित होते.
