मेहुणबारे पोलीस स्टेशनकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत प्रतिनिधी प्रशांत जोशी चाळीसगाव. दि ०८/६ /२५ रोजी मेहुणबारे पोलीस स्टेशन येथे तक्रारदार नामे प्रीतम पुरुषोत्तम बागुल वय २६ रा. चिंचगव्हाण ता.चाळीसगाव जी. जळगाव यांनी त्यांचे मालकीचे सोनालिका कंपनीचे ट्रॅक्टर क्र. एम. एच. १९.ई.ए. ३२३४ हे शेड मध्ये लावून ठेवलेले असताना कोणीतरी अज्ञात इसमाने सदर ठिकाणी येऊन नमूद ट्रेक्टरचे ट्रॉली जोडण्याचे डाबर व पिना तसेच रोटर नांगर जोडन्यासाठी आवश्यक असणारे आडवे उभे हात असे एकूण ५००००/- रुपये किमतीचा स्पेअर पार्ट खोलून चोरून नेलेबाबत दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा रजि. १३७/२५ भा. न्या. सं. कलम ३०३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्हा पोलीस अधीक्षक मा. डॉ. महेश्वरी.रेड्डी सो.अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव मा. श्रीमती कविता नेरकर सो. व उपविभागीय पोलीस अधिकारी पाचोरा उपविभाग(चार्ज चाळीसगाव उप विभाग ) मा. श्री धनंजय येरुळे सो. यांनी पोलीस स्टेशन हद्दीत घडणारे चोरीचे गुन्हे उघडकीस आणून मुद्देमाल हस्तगत करणे बाबत मार्गदर्शन व सूचना दिल्या होत्या मा.वरिष्ठांच्या सूचनाप्रमाणे गुन्ह्याची सखोल तपास करून गुन्ह्यांतील आरोपींचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणणेकामी प्रभारी अधिकारी श्री. प्रवीण दातरे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी पोलीस स्टेशन अधिकारी व अंमलदार यांचे एक पथक तयार केले होते पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी गोपनीय माहितीच्या आधारे कौशल्या ने चोरीचा गुन्हा उघडकीस आणून संशयित आरोपी नामे (१) प्रवीण जालिंदर पाटील वय २८ (२) दिलीप श्रीराम निकम वय २२ वर्षे दोघांची राहणार चिंचगव्हाण ता. चाळीसगाव जि. जळगाव यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली होती नमूद दोन्ही आरोपींना मा.न्यायालयाकडून पोलीस कस्टडी रिमांड मध्ये घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्याचे अनुषगांने तपास केला असता त्यांनी गुन्ह्यांची कबुली देऊन गुन्ह्यांतील नमूद ट्रॅक्टर चोरीचे केलेले५०००/- रुपये किमतीचे नमूद स्पेअर पार्ट काढून दिले असून ते जप्त करण्यात आलेले आहे सदरची कामगिरी माननीय वरिष्ठांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी श्री.प्रवीण अ.दातरे सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक श्री सुहास आव्हाड पो कॉ. मोहन सोनवणे किशोर पाटील शांताराम पवार पोलीस कॉ.विनोद बेलदार यांनी केलेली आहे
