एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातर्गंत अर्ज करण्याचे आवाहन
प्रतिनिधी राजेंद्र घुगे नासिक
दि. 4 जून :- एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत सन 2025-26 अंतर्गत फळे, फुले, मसाला लागवड, अळिंबी उत्पादन प्रकल्प व जुन्या फळबागांचे पुररूज्जीवन हा घटक राबविण्यात येत आहे. यामध्ये विदेशी फळे, फुले, मसाला लागवड व आंबा, चिकू, संत्रा व मोसंबी, लिंबु, पेरु, आवळा या फळपिकांच्या जुन्या फळबागांचे पुररूज्जीवन करणे तसेच अळिंबी उत्पादन प्रकल्प उभारणे करणे या बाबींचा समावेश आहे.
तरी सर्व शेतकऱ्यांनी विदेशी फळे, फुले, मसाला लागवड व अळिंबी उत्पादन प्रकल्प उभारणे करणे तसेच आंबा, चिकू, संत्रा व मोसंबी, लिंबु, पेरु, आवळा या फळपिकांच्या बागा असलेल्या अधिकाधिक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टल mahadbtmahait.gov.in फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावेत. योजनेच्या अधिक माहितीसाठी संबंधित नजीकच्या कृषि कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.
