मेहुणेबारे पोलीसाची कामगिरी चोरी गेलेला माल ६ तासात हस्तगत केले प्रतिनिधी प्रशांत जोशी चाळीसगाव. मेहुणेबारे पोलीस स्टेशनकडून दिवसा घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला दि १८/५/२५ रोजी तक्रारदार दीपक नामदेव पाटील वय ४८/ रा देवळी ता चाळीसगाव हे त्यांच्या कुटुंबायांस राहते घरास कुलूप लावून लग्नासाठी बाहेरगावी गेले असता त्यादरम्यान कोणीतरी अज्ञान चोरट्याने त्यांच्या घराचे दरवाजाचे कुलूप उघडून घरात प्रवेश करून लोखंडी शोकेस मधील लॉकर तोडून त्यातून तक्रारदार यांचे ३३ ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ३२५००० / रुपये किमतीचा ऐवज घरफोडी चोरी करून नेला बाबत तक्रारदार यांनी २०/५/२६ रोजी मेहूणेबारे पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली होती त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा रजि ११६ /२५ भा. न्या. सं. कलम ३३१(३ )३३१(४ ) ३०५प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्हा पोलीस अधीक्षक मा. डॉ श्री महेश्वर रेड्डी सो.अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव मा.श्रीमती कविता नेरकर सो. व उपविभागीय पोलीस अधिकारी चाळीसगाव उपविभागीय मा. श्री राजेशसिहं. चंदेल सो यांनी पोलीस स्टेशन हद्दीतील घडणारे दिवसा व रात्रीच्या घरपोडी चोरीचे गुन्हे उघडकिस आणून मुद्देमाल हस्तगत करणे बाबत मार्गदर्शन व सूचना दिल्या होत्या. मा. वरिष्ठांचे सूचनाप्रमाणे गुन्ह्याचा सखोल तपास करून गुन्ह्यातील आरोपींताचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणणेकामी प्रभारी अधिकारी श्री प्रवीण अ दातरे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी पोलीस स्टेशन अधिकारी व अंमलदार यांचे एक पथक तयार केले होते पथकातील अधिकारी अंमलदार यांनी तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे अधिकारी कौशल्याने सदरचा गुन्हा ०६ तासात उघडकीस आणून अशा प्रकारचे गुन्हे करणारा अभिलेखा वरील आरोपी नामे प्रवीण सुभाष पाटील वय ३२ वर्ष रा. बिलवाडी ता. जि जळगाव यास सदर गुन्ह्यात निष्पन्न करून अटक करण्यात आली होती त्यास मा.न्यायालया कडून न्यायालयाकडून पोलीस कस्टडी रिमांड मध्ये घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याचे अनुशंगाने तपास केला असता त्याने गुन्ह्यातील चोरीचे केलेले सोन्याचे दागिने व सराफाकडून वितळून घेतले असल्याचे तपासात निष्पन्न झाले सदर वितवलेल्या सोन्याची ३३/ ग्रॅम वजनाची ३.२०.००० रुपये किमतीची लगड नमूद आरोपी कडून जप्त करण्यात आलीआहे सदरची कामगिरी मा.वरिष्ठांच्या सूचना व मार्गदर्शनना खाली प्रभारी अधिकारी प्रवीण अ. दातरे सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलिस उपनिरीक्षक विकास शिरोळे व श्री सुहास आव्हाड. पोलीस कॉ. गोकुळ सोनवणे किशोर पाटील शांताराम पवार पो कॉ विनोद बेलदार संजय लाटे निलेश लोहार यांनी केली आहे
