असबी फाऊंडेशन तर्फे आयोजित करिअर मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न
नाशिक प्रतिनिधी : माजिद खान
शनिवार ता. 17/05/2025 रोजी अस्बी फाउंडेशन नाशिक यांच्या वतीने वडाळारोड येथील हाजी लाॅन्स येथे दहावी व बारावी च्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थी व बालकांमधील संभ्रम दूर होऊन त्यांना करिअर संबंधी योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी सदर कार्यशाळा आयोजित केली असल्याचे असबी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माजिद पठाण यांनी सांगितले. फैजल काझी व मोईज शेख यांच्या सहकार्याने सदर कार्यक्रम उत्तमरीत्या संपन्न झाला.
करिअर कांउसलर व मोटिवेशनल स्पिकर आसिफ शेख सर हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. शेख सर यांनी करिअरच्या विविध संधी, शैक्षणिक कोर्सेसची योग्य निवड कशी करावी, शिष्यवृत्तीचा लाभ घेऊन आर्थिक अडचणींवर मात करत उच्च शिक्षण कसे घ्यावे, सरकारी योजना, परदेशी शिक्षणाच्या वाटा इत्यादी विषयांवर सखोल व उपयुक्त असे मार्गदर्शन केले. विद्यार्थी व पालकांनी विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली.
या कार्यक्रमात निवृत्त आर्मी अधिकारी सुभेदार सलीम पठाण सर यांनी युवकांना भारतीय सेनेत येण्यासाठी प्रोत्साहित केले व वेळ प्रसंगी भारत देशासाठी आपले सर्वस्व अर्पण करण्याची तयारी ठेवावी असे सांगितले. त्यांनी कारगील युद्धातही मोलाचे योगदान दिले आहे. नाईक सुभेदार जाकिर पठाण सर यांनी आपल्या भाषणाद्वारे विद्यार्थ्यांना उत्तम आरोगयाचे महत्त्व सांगितले. पठाण बंधुनी 30 वर्षांपेक्षा जास्त काळ देशसेवा केली आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खतीबे शहर हिसामुद्दिन खतीब होते तर व्यासपीठावर काजीए शहर एजाज काझी, निवृत्त सुभेदार सलीम पठाण सर व नाईक सुभेदार श्री. जाकिर पठाण सर, वरिष्ठ वकिल एम. टि. क्यु. सैय्यद, करिअर काउंसलर आसिफ शेख सर, एड. नाजीम काजी, कारी जहुर अशरफी, हसन मुजावर बिल्डर, तनवीर तांबोली हे उपस्थित होते.
करिअर मार्गदर्शनासोबतच दहावी व बारावीच्या परीक्षेत नैपुण्य मिळविलेल्या विध्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले.
कार्यकर्माच्या यशस्वीतेसाठी मुदस्सर काजी, मोबीन मेमन, मुजाहिद सैय्यद, जमीर शेख आसिफ शेख, एड.वसीम खान, जोहेब कुरेशी, तैय्यब कुरेशी, अश्पाक शेख, मतीन पठाण, मुफिज शेख, मारुफ पठाण शोहेब खान, सोहिल बागवान ,फरिद शेख, मोसिन खान अय्युब खान यांनी परिश्रम घेतले.
असबी फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष माजीद पठाण यांनी असे शैक्षणिक कार्यक्रम नियमितपणे घेतले जातील असे मत व्यक्त करत सर्वांचे आभार व्यक्त केले. सदर करिअर मार्गदर्शन कार्यशाळेत पाचशे हुन अधिक विद्यार्थी व पालकांनी उपस्थिती नोंदविली.
