रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (D, S) प्रणित राष्ट्रीय नगरपंचायत कामगार संघटनेच्या यशस्वी आंदोलनाचा महाराष्ट्रातील नगरपंचायत कामगारांना होणार फायदा प्रतिनिधी रत्नदीप जाधव नाशिकरॊड बुधवार दि. ५ मार्च २०२५ रोजी रिपाईच्या वतीने नगरपंचायत कामगारांचे सरसकट समावेशन करावे, फरकाची रक्कम व्याजासकट देण्यात यावी, सफाई कामगारांच्या वारसांना नोकरीत सामावून घ्यावे.या मागणीसाठी मुंबई मंत्रालय येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. प्रेमरत्न चौकेकर, राष्ट्रीय महासचिव मा. मिलिंद जावळे, राष्ट्रीय सचिव कैलासभाई पगारे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन छेडण्यात आले. सदर धरणे आंदोलन मुंबई अध्यक्ष अतुल काळे, सुहास पवार यांनी आयोजित केले होते. सदर धरणे आंदोलनात नाशिक,मुंबई, पुणे, रायगड, येथून मोठया प्रमाणावर कामगार सहभागी झाले होते. आंदोलनाच्या सुरुवातीपासूनच मंत्रालय प्रशासन व पोलीस प्रशासनावर मोठा दबाव होता. त्यामुळे सुरुवातीलाच मुंबई डी. सी. पि यांनी कैलासभाई पगारे यांची भेट घेतली. आणि मागण्या समजून घेतल्या. तुमच्या मागण्या रास्त असून आपली लवकरात लवकर नगरविकास सचिवांशी बैठक आयोजित करू असा शब्द दिला.त्यांनी शब्द दिल्याप्रमाणे सायंकाळी ५ वाजता मंत्रालयात नगरविकास उपसचिव श्रीमती प्रियंका कुलकर्णी (छापल ) मॅडम यांच्या दालनात बैठक आयोजित केली.बैठकीस पक्षाचे राष्ट्रीय सचिव कैलासभाई पगारे मुंबई अध्यक्ष अतुल काळे व पोलीस अधिकारी तसेच अतिरिक्त सचिव उपस्थित होते ग्रामपंचायत मध्ये अनेक वर्ष कायम असलेल्या कामगारांना २०१५ सालीच्या शासन आदेशाने एका रात्रीत रोजंदारी कामगार घोषित करून त्यांच्यावर मोठा अन्याय केला होता. शासन एवढेच करून थांबले नाही तर, त्यांना किमान वेतनापासुनही वंचित ठेवण्यात आले. म्हणून शासनाने उदघोषणेपूर्वीच्या सर्व कामगारांचे सरसकट समावेशन करण्यात यावे. त्यांचा किमान वेतनाचा फरक देण्यात यावा, सफाई कामगारांच्या ह्या मागण्या कैलासभाई यांनी लावून धरल्या त्यावेळेस आपली मागणी योग्य असून एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात नगरविकास सचिव,डी एम ए,व राष्ट्रीय नगरपंचायत कामगार संघटना यांची संयुक्त बैठक लावू आणी लवकरात लवकर प्रश्न निकाली काढू असे आश्वासन उपसचिव प्रियंका कुलकर्णी मॅडम यांनी दिले. त्यानंतर सदर आंदोलन मागे घेण्यात आले त्यावेळी छोटेखानी सभा होऊन राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. प्रेमरत्न चौकेकर, राष्ट्रीय महासचिव मा. मिलिंद जावळे, सचिव राजेंद्र झेंडे, यांनी विचार व्यक्त केले, संघटनेचे कायदेशीर सल्लागार ऍड. प्रभाकर रनशूर यांनी वेळप्रसंगी कामगारांची उच्च न्यायालयात बाजू मांडण्याचे आश्वासन दिले मुंबईचे नेते सुहास पवार यांनी आभार मानले आंदोलनात उत्तर महाराष्ट्र नेते अरुण गांगुर्डे, दिंडोरीचे माजी बांधकाम सभापती नाना निकम महिला कामगार नेत्या मंगला गवारे, किरण सोलंकी, गोटीराम मेधने,लक्ष्मी केदारे सुशील गायकवाड, विलास पगारे, गोविंद गवारे,विमल निकम सुमन शार्दूल, रतन पांडव इत्यादी अनेक शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. मंत्रालयातील बैठकीनंतर कामगारांनी मोठा जल्लोष केला व लगेच महाराष्ट्रातील अनेक नगरपंचायत कामगारांनी फोन करून रिपाई नेते आणी संघटना पदाधिकारी यांचे आभार मानले