भाजप बुद्धिजीवी प्रकोष्ठ तर्फे नाशकात भव्य काव्य संमेलनाचे आयोजनप्रतिनिधी माजिद पठाण नासिक माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी ‘राष्ट्रभक्ती’ या विषयावर भव्य काव्यसंमेलनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती बुद्धिजीवी प्रकोष्ठचे उत्तर महाराष्ट्र संयोजक चंदन पवार यांनी पत्राद्वारे दिली आहे.
हे भव्य काव्यसंमेलन भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे. बुधवार, दि. २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ ते ७ वाजेपर्यंत विशाखा सभागृह, कुसुमाग्रज स्मारक, विद्या विकास सर्कल, गंगापूर रोड, नाशिक येथे पार पडणार आहे. संमेलनात नाशिकमधील सुप्रसिद्ध २० निमंत्रित मराठी कवी व ६ हिंदी कवी आपली काव्यप्रतिभा सादर करणार आहेत. स्वर्गीय अटलजींच्या पावन स्मृतीनिमित्त कवितांचा जागर करून राष्ट्रभक्ती गीतांवर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, नाशिककरांनी मोठ्या संख्येने या काव्यसंमेलनास हजेरी लावावी, असे आवाहन नाशिकचे बुद्धिजीवी प्रकोष्ठचे संयोजक डॉ. श्रीधर व्यवहारे व नाशिक महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव यांनी केले आहे.
या कार्यक्रमास भाजप प्रदेश सहमुख्य प्रवक्ते व भाजप बुद्धिजीवी प्रकोष्ठचे प्रदेश संयोजक अजित चव्हाण, प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, भाजप प्रदेश बुद्धिजीवी प्रकोष्ठचे सहसंयोजक रोहन देशपांडे, उत्तर महाराष्ट्र संयोजक चंदन पवार, सह संयोजक स्वप्नील शितोळे नाशिक महानगर यांची उपस्थिती असणार आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शशिकांत जाधव, विपुल मेहता, प्रवीण जोशी प्रयत्नशील आहेत. काव्यसंमेलन समितीचे डॉ. सुनील साईखेडकर, पी. डी. कुलकर्णी, नंदकिशोर ठोंबरे आदि मान्यवर कवींसोबत समन्वय साधत आहेत. काव्यसंमेलनाचा लाभ घेण्यासाठी https://forms. gle/9335z7FKt2rjir7u8 या लिंकवर क्लिक करून कार्यक्रमासाठी नोंदणी करण्याचे आवाहन आयोजन समितीतर्फे करण्यात आले आहे.