द्वारका नासिक येथील -डॉक्टर झाकीर हुसेन रुग्णालय व गणपतराव आडके नर्सिंग कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक महानगरपालिका मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. रावते सर यांच्या मार्गदर्शनाखाली बेटी बचाव बेटी पढाव अभियान रॅली संपन्न झाली. सदर रॅलीमध्ये गणपतराव आडके नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनी व झाकीर हुसेन हॉस्पिटलचे सर्व कर्मचारी सहभागी झाले होते. रॅलीमध्ये सर्व सहभागी विद्यार्थ्यांनी परिसरातील नागरिकांना मुलीच्या जन्माचे महत्त्व विविध घोषणांद्वारे विशद केले. तसेच गणपतराव वाडके नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनींनी बेटी बचाव बेटी पढाव या विषयावर पथनाट्य सादर करून उपस्थितांचे मन हेलावून टाकले व या पथनाट्याच्या माध्यमातून मुलींच्या जन्माचे सर्वांनी स्वागत केले पाहिजे असा संदेश दिला. सदर रॅलीच्या यशस्वीतेसाठी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अनिता हिरे मॅडम व रुग्णालयाच्या मेट्रन वासंती गावित यांनी नियोजनासाठी विशेष मेहनत घेतली. तसेच सदर रॅली बद्दल परिसरातील नागरिकांना जागृत करण्यासाठी रुग्ण कल्याण समितीचे सदस्य जुबेर हाश्मी यांनी विशेष मेहनत घेतली.सदर रॅलीमध्ये डॉ. मनोज कांकरिया, डॉ. किरण शिंदे, डॉ.विशाल जाधव,डॉ. आदिती देवरे,डॉ. हेमराज धोंडगे डॉ. बच्छाव मॅडम,डॉ. धुमाळ सर, औषध भांडार प्रमुख शिरोडे सर, लॅब प्रमुख काझी मॅडम, एक्स-रे विभाग प्रमुख चौधरी सरउपस्थित होते.सदर रॅली ही नानावली, जुने नाशिक, शिवाजी चौक,सारडा सर्कल, कथडा व द्वारका यामागे डॉक्टर झाकीर हुसेन रुग्णालयात समारोप झाला. बेटी बचाव बेटी पढाव रॅली संपन्न झाल्याबद्दल रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अनिता हिरे यांनी डॉक्टर नितीन रावते सर व गणपतराव आडके नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर प्रवीण घोलप सर तसेच नर्सिंग कॉलेजचे सर्व स्टाफ व विद्यार्थी यांचे आभार व्यक्त केले. रुग्णालयाच्या विविध उपक्रमामध्ये नेहमीच हिरीने सहभाग नोंदविणारे रुग्ण कल्याण समितीचे सदस्य जुबेर हाश्मी यांनी सुद्धा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष मेहनत घेतल्याबद्दल डॉ. नितीन रावते व डॉ. अनिता हिरे मॅडम यांनी त्यांचा सत्कार केला. डॉक्टर नितीन रावते सर यांनी रॅली यशस्वीपणे संपन्न झाल्याबद्दल रुग्णालयाचे सर्व कर्मचारी विद्युत विभागाचे कर्मचारी सुरक्षा विभागाचे कर्मचारी तसेच पोलीस डिपार्टमेंटचे अधिकारी यांचे विशेष आभार मानले.