सागर पाटील/प्रतिनिधी-दक्ष पोलीस वार्ता न्युज, नाशिक

नाशिक-पुणे मार्गावरील शिंदे टोल नाक्यावरील कर्मचारी आंदोलनात उतरल्याने रात्री १२ वाजेनंतर टोल न देताच सर्व वाहने धावत आहेत, कर्मचाऱ्यांना सबळ कारण न देता कामावरून काढले जाते, व्यवस्थापन लक्ष देत नाही, व्यवस्थापक अपमानास्पद वागणूक देतात, कर्मचाऱ्याचा छळ करतात यांसह विविध मागण्यांसाठी सदर टोलवरील कर्मचारी आंदोलन करीत आहे. या आंदोलनामुळे रात्री १२ वाजेपासून टोल न देताच वाहने धावत आहे. आज सकाळी सर्व कर्मचारी या ठिकाणी एकत्र आले आणि त्यांनी टोल व्यवस्थापन समितीविषयी तक्रारी केल्या.

साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता
संपर्क : +919822817037 / +919822117037

