राजेंद्र कोल्हे/प्रतिनिधी-दक्ष पोलीस वार्ता,चांदवड

संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सुरु असलेल्या बोगस शिक्षक घोटळ्यात आपल्या चांदवड तालुक्यात आठ बोगस शिक्षक असल्याने राज्य शिक्षण विभागाने बोगस शिक्षकांची यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्र राज्यातील चार जिल्ह्यांची बोगस शिक्षकांची यादी जाहीर केल्याने १७९ शिक्षक बोगस असल्याचे आढळून आले आहे. नाशिक, धुळे, जळगाव या जिल्हात सर्वाधिक बोगस शिक्षक कार्यरत असून चांदवड तालुक्यात आठ बोगस शिक्षक कार्यरत आहेत.
चांदवड शहरात चार बोगस शिक्षक तर वडनेर भैरव ,धोडंबे, रायपूर, धोंडगव्हाण येथे प्रती एक बोगस शिक्षक तर असे एकूण ८ बोगस शिक्षक कार्यरत आहेत. चांदवड़ च्या नेमिनाथ जैन संस्थेत चार बोगस शिक्षक नेमिनाथ जैन संस्था नेहमीच वादात असते. मागील काही वर्षा आधी या संस्थेत इंजिनिअरिंग महाविद्यालयातील प्राचार्य चक्क दहावी शिकलेला आढळून आला होता. आता पुन्हा या संस्थेत चक्क चार बोगस शिक्षक आढळून आल्याने खळबळ उडाली असून चांदवड तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे भविष्य पुन्हा विचार करणे यावर प्रश्न निर्माण झाला आहे.
नेमीनाथ जैन विद्यालय चांदवड
१) दिपक बाजीराव जामदार,
२) प्रवीण सुदाम देशमुख,
३) अर्चना साहेबराव देवरे,
४) सिमा दिलीप भदाने.
जनता विद्यालय वडनेर भैरव
१) दिवकर पुंडलिक पवार.
के.के. वाघ विद्यालय धोडंबे.
१) संदीप अंबादास ठाकरे.
श्रीराम विद्यालय रायपूर (भडाणे)
१) नितीन लक्ष्मण देवरे.
न्यू इंग्लिश स्कुल धोंडगव्हाण
१) राजीनीकांत अशोकराव देशमुख.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता
संपर्क : +919822817037 / +919822117037

