मेहुनबारे पोलीस स्टेशन कडूनअनोळखी आरोपी त्यांनी केलेल्या खुनाचे प्रयत्नाचा गंभीर गुन्हा उघडकीस आणला
. प्रतिनिधी प्रशांत जोशी उंबरखेड.०४/०१/२०२५ रोजी रात्री११/३० वाजे च्या सुमारास इसम नामे अशोक रघुनाथ गायकवाड वय 60 वर्ष राहणार देवळी तालुका चाळीसगाव हे त्यांच्या राहत्या घरामध्ये झोपलेले असताना दोन अनोळखी इसमांनी तोंडावर रुमाल बांधून घरात मागील दरवाजाने प्रवेश करून काही एक न बोलता त्यांच्याकडील धारदार तलवारीने व चाकूने अतिशय निर्दयीपणे वकृतपणे वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता त्यांच्या डोक्यावर दोन्ही गालांवर व दोन्ही हातांवर वार करण्यात आले होते यामध्ये अशोक गायकवाड यांना त्यांच्या डाव्या हात गमवावा लागला आहे. सदर बाबत जखमी अशोक गायकवाड यांची सून बेबाबाई चंदर गायकवाड राहणार देवळी तालुका चाळीसगाव यांच्या तक्रारीवरून मेहुनबारे पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ०३/२०२५ भा. न्या. स. कलम १०९/३३२. सी २३८/३ सह मुंबई पोलीस अधिनियम १५१ चे कलम ३७ चे पोट कलम १ व ३/१३५सह भारतीय हत्या कायदा कलम ३/२५प्रमाणे गुन्हा दाखल आहे. नमूद गुन्ह्यातील आरोपी हे अनोळखी असल्यामुळे तसेच सदरची घटना ही रात्रीच्या वेळी घडली जादूटोणाच्या संशयातून हा हल्ला करण्यात आला आहे याप्रकरणी मिळून बारा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होतात पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवून देऊळ येथील तरुणासह त्यांचे अल्पवयीन भावाला ताब्यात घेतली त्यांनी या हल्ल्याची कबुली दिली सदर प्रकार हा रात्रीच्या सुमाळात घडल्याने हल्लेखोरांची ओळख पटवणे मेहुनबारे पोलिसांपुढे आव्हान होते. वरिष्ठांनी दोन्ही अनोळखी व्यक्तीच्या शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याचा सूचना दिल्या. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण दातारे यांनी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे एक पथक नेमले श्री दातारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुहासआव्हाड विकास शिरोळे हवालदार गोकुळ सोनवणे दिनेश पाटील किशोर पाटील शांताराम पवार प्रकाश कोळी नंदकिशोर महाजन अशोक राठोड पोलीस कॉन्स्टेबल विनोद बेलदार संजय लाटे निलेश लोहार भूषण बाविस्कर यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे गुन्हा उघडकीस आणून सागर राजू गायकवाड २४ राहणार देवळी यास अटक केली त्यास बोलते केले असता सागर यांनी आपल्या अल्पवयीन लहान भावाच्या मदतीने हा हल्ला केल्याची कबुली दिली पोलीस या अल्पवयीन मुलास देखील या गुन्हा प्रकरणी ताब्यात घेतली. त्यांची अभिरक्षागृह जळगाव येथे रवानगी करण्यात आली आरोपी त्यांनी जखमीवर ज्या तलवार व चाकू वार केले होते ती हत्यार जप्त करण्यात आली आहे.
