नविन शैक्षणिक धोरण टप्प्याटप्प्याने अंमलात येईल. डॉ. सोनवणे.
प्रतिनिधी माजिद खान नासिक गुरुकुल फाऊंडेशन व पीसीसीडीएच्या वतीने १३० शिक्षक ” उत्कृष्ट गुरुवर्य पुरस्काराने ” सनम्मानित
नविन शैक्षणिक धोरण जरी जाहीर झाले असले तरी, त्यांची अंमलबजावणी एकदम होणार नाही. जुन २०२५ मध्ये काही वर्गांचा अभ्यासक्रम बदलेल व त्यानंतर प्रत्यक्ष संपुर्ण धोरणाची अंमलबजावणी ही पुढील वर्षी म्हणजे २०२६ पासूनच शक्य आहे. दहावी बारावीच्या बोर्ड परिक्षा या देखील चालूच राहतील. विषय निवडण्याचे स्वातंत्र्य इयत्ता नववीपासूनच असेल.”
असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणेचे विभागप्रमुख डॉ. योगेश सोनवणे यांनी आज येथे एका व्याख्यानात सांगितले. नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक पीसीसीडीए व गुरुकुल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी, कोर्टयार्ड हॉटेल येथे आयोजित नविन शैक्षणिक धोरण व उत्कृष्ट गुरुवर्य पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. त्यांच्या हस्ते महाराष्ट्रातील १३० गुणवंत यशस्वी क्लासेस संचालक शिक्षकांचा, उत्कृष्ट गुरुवर्य हा पुरस्कार देवुन सन्मान करण्यात आले. प्रास्ताविक संघटनेचे अध्यक्ष जयंत मुळे आणि गुरुकुल फाऊंडेशन चे संचालक प्रा. युवराज कराड यांनी केले. यावेळी मयुर जाधव, संतोष बच्छाव, राहुल नागरे, घनश्याम अहिरे, किशोर सपकाळे, योगेश बोरसे, विद्या रोकडे, गोरक्ष लांडे, सुनीता लांडे, दुर्गेश तिवारी, गणेश कोतकर, दिनेश राठोड, ज्योती शिवले, दिपक शिवले, लिना ठाकरे, गायत्री बागले, रविंद्र पाटील, गणेश पवार, माधवी चिंतामणी, रोहिणी भामरे, प्रमोद गुप्ता, अनिल दवणे, स्नेहल बोडके, संतोष बत्तीसे, सोनाली आहेर, रविंद्र कांकरिया, विवेक भोर, सचिन अपसुंदे, स्वप्नाली अपसुंदे, मुकुंद रनाळकर, हर्षदा हेनरी, सरदार हेनरी, कैलास गिते, गायत्री चौधरी, विक्रांत राजगुरू, दिपाली मोगल, सुनील मोरे, धनंजय भामरे, निशा ठाकरे, प्रतिभा गांगुर्डे, मच्छिंद्र आव्हाड, अनंत चांदवडकर, अभिमान पाटील, सचिन ढोली, वाल्मीक सानप, उमादेवी विश्वकर्मा, भारती जाधव, प्रकाश खैरनार, दिलीप पवार, स्वाती जगताप, कांता घाडगे, किर्ती माळी, शाहीन शेख, सुवर्णा रोकडे, मेघा हिरवे, वैशाली भोर, किरण सुर्यवंशी, मनीष सुरसे, आमिन शेख, निलेश दुसे, प्रितेश जाधव, मनिष जोशी, मयुर ठाकरे, गौरी मैंद, निलेश देवरे, प्रार्थना जेजुरे, योगिता भगत, सुनीता पवार,
वैशाली शिंदे, महेंद्र मंडलिक, कैलास खताळे, संजय अभंग, दिपाली पिंगळे, अरूण कुशारे, महेश थोरात, राज बंदरे, रविकांत यादव, स्वप्निल कदम, विशाल पाटील, प्रदीप घोटेकर, अभिलाष पंडीत, समृद्धी पंडीत, रमेश ठाकरे, प्रज्ञा पगार, रूपाली अमृतकर, स्नेहल थोरात, सारिका सावंत, रूद्राणी राकडे, रोशन पाटोळे,सविता खताळे, गजानन चोपडे, वंदना खाडे, किरण पगार, प्रतिभा देवरे, सारिका जोशी, नरेंद्र निकुंभ, कैलास हारदे, योगेश बाहेती, शशिकांत तिडके, इम्रान पटेल, आदी क्लासेस संचालक शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी दिलिप ढाकणे व गुरुकुल फाउंडेशनच्या कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
