प्रकल्प स्तरीय क्रीडा वर्ष २४/२५ स्पर्धेत दाभोसा ता जव्हार आश्रमशाळेला घवघवीत यश
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार अंतर्गत प्रकल्प स्तरीय क्रीडा स्पर्धा १०/१२/२४/२५ दि. १२/१२/२४ या कालावधीत शासकीय आश्रमशाळा विनवळ येथे नुकतीच संपन्न झाली असून या स्पर्धेत शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून शासकीय आश्रमशाळा दाभोसा येथील विद्यार्थ्यांनी १४ वर्षे मुली या गटातून हॉलिबॉल व हॅंडबॉल, १७ वर्षे मुली हॉलिबॉल व हॅंडबॉल व १४ वर्षे मुले हॅंडबॉल प्रथम पारितोषिक पटकावले असून सलग तीन वर्षापासून दाभोसा शाळेने ह्या क्रीडा प्रकारात आपले स्थान कायम ठेवले आहे. तसेच वैयक्तिक गटातून कुमारी रोहिणी पांडुरंग खिरारी हिचा गोळाफेक या क्रीडाप्रकारात प्रथम क्रमांक पटकावला आहे. कुमार मनोहर नीलेश मोरघा हा ५००० मीटर चालणे या क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक व भावेश दिलीप गावीत या विद्यार्थ्याने तृतीय क्रमांक पटकाविला आहे. यामुळे पुन्हा दाभोसा आश्रमशाळेचे नाव प्रकल्पात प्रसिद्ध झाले असून या करिता या शाळेतील मुख्याध्यापक श्री. गजानन लुटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. अविनाश मजगे सर, श्री. अविनाश बुंधे सर व शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले. या क्रीडास्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यात मा. श्रीम. करिश्मा नायर मॅडम प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार तसेच श्री. थाळकर सर कोब्रा कमांडो, श्री. दीपक टिके साहेब सहाय्यक प्रकल्प अधिकारी, जव्हार , श्री. सुभाषसिंह परदेशी साहेब सहाय्यक प्रकल्प अधिकारी, जव्हार व प्रकल्प कार्यालयातील विविध अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
