रमिन काद्री/विभागीय संपादक-दक्ष पोलीस वार्ता, निफाड

१ डिसें, २०१८ पासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. या योजनेनुसार दोन हेक्टर पर्यंत शेतजमीन असलेले शेतकरी कुटुंब लाभार्थी आहेत. या योजनेअंतर्गत प्रतिवर्ष सहा हजार रुपये दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये दिली जाते मात्र यापुढे हा लाभ सुरू ठेवण्यासाठी केंद्र सरकारने ई-केवायसी करणे अनिवार्य केले आहे. या योजनेंतर्गत ई-केवायसी करण्यासाठी यापूर्वी विशेष जनजागृती मोहीम राबवण्यात आली आहे.

मात्र यापुढे PM किसान सन्मान निधीचा लाभ मिळवण्यासाठी शेतकरी लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत केवायसी करावीच लागणार आहे. यासाठी शासनाने ३१ ऑगस्ट पर्यंत मुदत दिली असुन संकेतस्थळावर अथवा ग्राहक सेवा केंद्रावर जाऊन बायोमेट्रिक सुविधावरे ई-केवायसी करता येणार आहे. केवायसी न केल्यास योजनेचे पुढील सर्व हप्ते थांबवले जाणार आहेत.

शासनाने वारंवार मुदतवाढ देऊनही बऱ्याच शेतकऱ्यांचे केवायसी अजूनही झालेले नाही, म्हणुन ३१ ऑगस्ट पर्यंत शासनाने केवायसी करण्याचे बंधनकारक केले आहे. हि प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या शेतकरी लाभार्थ्यांना पीएम किसान सन्मान निधीच्या पुढील हप्त्याचा लाभ दिला जाणार नाही असे निर्देश शासनाने दिले आहेत त्यामुळे लाभार्थ्यांनी सूचनांप्रमाणे केवायसी पूर्ण करून घ्यावी असे आव्हान तहसीलदार यांनी दिले आहे.
साजिद शेख
मुख्य संपादक- दक्ष पोलिस वार्ता
संपर्क : 9822817037 / 9822117037

