अंबड पोलीस स्टेशन हद्दीत पोलीससांचा रूट मार्च
अंबड पोलीस स्टेशन हद्दीत आगामी विधानसभा निवडणूक 2024 शांततेच्या वातावरणात पार पडावी या करिता मा.पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांचे आदेशान्वये मा. पोलीस उपायुक्त परिमंडळ 2, नाशिक शहर यांचे व मा. सहा.पोलीस आयुक्त अंबड विभाग यांचे मार्गदर्शनाखाली आज दिनांक 17/11/ 2024 रोजी 17 :15 ते 18:15 वाजे पावे तो रूट मार्च सिडको परिसरात काढण्यात आला *प्रतिनिधी माजिद खान नासिक* सदर रूट मार्च अंबड पोलीस स्टेशन येथून सुरु होऊन – गणेश चौक – स्टेटबँक चौक – लेखानगर – शिवाजी चौकभाजीमार्केट – छ.शिवाजी महाराज चौक – महाराणा प्रताप चौक -विजयनगर – अंबड पो.स्टे. येथे समारोप करण्यात आला सदर रूट मार्चमध्ये अंबड पोलीस स्टेशन कडील 2 पोलीस निरीक्षक 4 पोउपनि व 40 अंमलदार, 38 पुरुष होमगार्ड , 19 महिला होमगार्ड तसेच एस.ए.पी. गुजरात चे 2 अधिकारी व 48 जवान असे रूट मार्चमध्ये सहभागी झाले होते रूट मार्च शांततेत पार पडला रूट मार्च समारोह त्या ठिकाणी सर्व अधिकारी अंमलदार व होमगार्ड यांना चहा पाण्याची सोय करण्यात आली होती.
मतदार संघ 125 नाशिक पश्चिम माहितीस्तव आदरपूर्वक सादर
