*दूधबाजार नासिक विजदुरुस्ती कामकरताना विजेचाधक्का लागून विजकर्मचारी जखमी* जुने नासिक दूध बाजार जुने नाशिक परिसरातील दूध बाजार येथे वीज वाहिनीचा काम करण्यासाठी आलेल्या वायरमन विजेचा धक्का लागून खाली पडला. परिसरातील नागरिकांनी बेशुध्द अवस्थेत असलेल्या वायरमनला त्वरित रुग्णालयात दाखल केले. संबंधित वीजवितरण विभाग हाकेच्या अंतरावर असून सुद्धा कार्यालयात नागरिकांनी संपर्क साधला असता कोणीही याची दखल घेतली नाही. काही तास उलटून ही संबंधित अधिकारी त्याठिकाणी उपस्थित राहिले नाही. या घटनेची दखल ही घेतली नाही. संबंधित विजवितरण अधिकाऱ्यांचा या हलगर्जीपणामुळे जीवितहानी झाली असती. यावर परिसरातील नागरिकांनी आपला रोष दर्शवला. परिसरातील नारिकांनी संबंधीत वीजवितरण अधिकाऱ्यावर कार्यवाही झाली पाहिजे अशी मागणी करत आहे. प्रतिनिधी जुल्फेखार शेख नासिक
