मकरंद बात्रे/प्रतिनिधी-दक्ष पोलीस वार्ता,जव्हार

जव्हार तालुक्यातील चांभार शेत ग्रामपंचायत मध्ये सदस्यांना विश्वासात न घेता पेसा समितीचे अध्यक्ष सरपंचासह ग्रामसेवक मनमानी करत असल्याचा आरोप करत पेसा समितीचे अध्यक्ष बदलण्याची मागणी ग्रामपंचायत चे उपसरपंच कॄषणा बात्रा व सदस्यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती जव्हार यांच्या कडे पत्रानवे केली आहे.
दोन्ही अडीच हजार लोक वस्ती असलेल्या ग्रामपंचायत चांभार शेत ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक बळवंत गवळी, सरपंच सौ योगीता जाबर व पेसा समितीचे अध्यक्ष महेश चौधरी हे ग्रामस्थांना उपसरपंचासह सदस्यांना विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेतात असा आरोप उपसरपंच व सदस्यांनी केला आहे तसेच विकास आराखड्यात कमी तरतूद असताना जास्तीत जास्त रक्कमेची खरेदी करणे व तशी बिले काढणे वेळेवर ग्रामसभा व मासिक सभा न घेणे, सभासदांनी खर्चाचा हिशेब मागीतल्या नंतर अध्यक्ष सरपंचासह ग्रामसेवक हे अरेरावीची भाषा वापरणे,अशा अनेक तक्रारींचा पाढाच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री पालवे यांच्या कडे तक्रारीत म्हटले आहे.
ग्रामस्त व सदस्यांच्या म्हणण्यानुसार 15/10/2023 ते आजपर्यंत फक्त तीन मासिक सभा व तीन ग्रामसभा झाल्याचे म्हटले आहे ग्रामपंचायत अधिनियम नुसार ग्रामसभा व मासिक सभा वेळेवर घेणे बंधनकारक असतानाही सरपंच व ग्रामसेवक यांनी या नियमाला बगल दिल्याने ग्रामस्थांना अनेक सोयीसुविधा व विकास योजनांना मुकावे लागत आहे तसेच पेसा समितीचे अध्यक्ष महेश चौधरी हे ग्रामसभा व मासिक सभेतील विकास कामे न घेता परस्पर निर्णय घेऊन दर्जा हिन साहित्य खरेदी करणे व अन्य वस्तूंच्या जास्तं दरानं खरेदी करून पेसा निधीचा गैरवापर करून भष्टाचार करत असल्याचा आरोप करत आहे.
त्यामुळे आम्ही सर्व ग्रामस्थ उपसरपंचासह सदस्य पेसा समितीचे अध्यक्ष महेश चौधरी यांना तत्काळ पदावरून हटविण्याची मागणी करत आहे त्या जागी ग्रामस्थांच्या एकमताने ग्रामसभेत ठराव संमत करून पेसा समितीचे अध्यक्ष दुसरा निवड करु त्याचप्रमाणे ग्रामसेवक यांनी केलेल्या मनमानी ची हि चौकशी करण्याची मागणी आम्ही या पत्रानवे करत असल्याचेही म्हटले आहे या प्रकारामुळे ग्रामसेवकांची मुजोरी पुन्हा समोर आली आहे यावर वेळीच चाप लावला पाहिजे असा सुर ग्रामस्थांमधून करण्यात आले आहे.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

