जुल्फेखार शेख / प्रतिनिधी – दक्ष पोलीस वार्ता

डी वाय एस पी संदीप मिटके यांना बाभळेश्वर येथील हॉटेल साईप्रसाद येथे हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट चालवून वेश्याव्यवसाय करून घेतल्या जात आहे बाबत खात्रीशिर बातमी मिळाली. त्याप्रमाणे सदर ठिकाणी बनावट ग्राहक पाठवुन पंचासमक्ष छापा टाकुन एका पिडीत परप्रांतीय मुलीची सुटका करण्यात आली आहे आणि दिपक उर्फ बंटी बाबासाहेब थोरात रा. कोल्हार बुद्रुक तालुका राहाता या आरोपीला ताब्यात घेण्यात आले. आरोपी विरुद्ध लोणी पोलीस स्टेशन येथे अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. या कारवाईमुळे बाभळेश्वर परिसरातील अवैध धंदे करणार्यांचे धाबे दणाणले आहे.

सदरची कारवाई मा.श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक, अहमदनगर मा.स्वाती भोर मॅडम अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांच्या मार्गदर्शनाखाली डी वाय एस पी संदीप मिटके , पी आय गुलाबराव पाटील, ए पी आय युवराज आठरे,पी एस आय योगेश शिंदे, हवं है कॉ इरफान शेख,पो नी अशोक शिंदे,पो नी कृष्णा कुऱ्हे,पो नी श्याम जाधव,पो कॉ दिनेश कांबळे, नागरे, चालक पो कॉ नर्हे,हेड कॉ आप्पासाहेब थोरमिसे यांनी केली आहे.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

