रमिन कादरी/विभागीय संपादक-दक्ष पोलीस वार्ता,येवला
बाभुळगाव, ता. येवला येथील संतोष श्रमिक जुनियर कॉलेजमध्ये अकरावीच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला. कोरोनामुळे मागील दोन वर्षापासून ऑनलाईन पद्धतीने अकरावीचे वर्ग सुरू होते मात्र आता कोरोना निर्बंध शासनाने पूर्णतः हटविले असून शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्यावर भर दिला आहे.
येथील कनिष्ठ महाविद्यालयात विक्रमी ऍडमिशन झाले असून अकरावीचा वर्ग नुकताच सुरू करण्यात आला त्याप्रसंगी अकरावी मध्ये नवीन आलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत समारंभ आयोजित करण्यात आले होते.
याप्रसंगी कार्यक्रमांमध्ये प्रथम बारावीच्या विद्यार्थ्यांचे मनोगत तसेच नंतर अकरावी मध्ये नवीन आलेल्या विद्यार्थ्यांचे मनोगत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. बारावीच्या विद्यार्थ्यांनी नृत्यकला सादर करून विद्यार्थ्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे प्राचार्य श्री येवले सर यांनी स्वीकारले. या कार्यक्रमाप्रसंगी विभाग प्रमुख किरण पैठणकर सर, मनोहर खैरे सर, रावसाहेब मोहन सर, नवनाथ जाधव सर, किरण गायकवाड सर, अनर्थे सर, समाधान गायकवाड सर, देठे सर,अरुण जाधव सर, देवडे सर, कादरी सर, बाकळे सर, अरोरा सर, शाह सर, भड सर, फारुकी मॅडम, कीठे मॅडम, वाबळे मॅडम,जाधव मॅडम आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप अध्यक्षीय भाषणाने झाला. प्राचार्य येवले सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता
संपर्क : 9822817037 / 9822117037

