
नाशिकच्या सुन्नी मुस्लिम समाजाच्या वतीने सुन्नी मार्कजी सीरत कमिटी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांना निवेदन देण्यात आले काही अज्ञात असामाजिक कार्यकर्त्यांनी दि. 10/08/2023 रोजी रात्री अंधाराचा फायदा घेत मौजे कोलगाव थडी, ता. कोपरगाव, जि. अहमदनगरमधील मुस्लिमांचे प्रार्थनास्थळ असलेल्या आयशा मशिदीवर रात्री घुसून कुराण शरीफ हा पवित्र ग्रंथ काढून, फाडून फेकण्यात आला. पवित्र ग्रंथ कुराणची विटंबना करण्यात आली आहे. ही बाब तेथील काही स्थानिक रहिवाशांच्या निदर्शनास आणून देताच कुराण शरीफ हा धार्मिक ग्रंथ युवक विश्वस्त व नाशिक यांनी व्यवस्थित उचलून धरला.
कुराण शरीफ हा इस्लामचा मुख्य आणि मूलभूत धर्मग्रंथ आहे. इस्लामचे लोक हे पुस्तक खरे तर सर्व मानवजातीला पाठवले आहे. इस्लामच्या संकल्पनेनुसार, कुराण शरीफ हा अल्लाह तआलाचा शब्द आहे. अल्लाह तआलाने त्यांचे प्रेषित हजरत मुहम्मद सल्लल्लाहु अलह सल्लम यांना पाठवलेला हा अंतिम आणि सर्वोच्च धर्मग्रंथ आहे परंतु काही सामाजिक उपद्रवी आणि नाशिकच्या येणार्या असामाजिक बेकायदेशीरपणे मशिदीत प्रवेश करून पवित्र ग्रंथ काढून आणि फाडून टाकला. जे घडले ते अत्यंत खेदजनक आहे. या प्रकाराचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत. आपल्या सर्व मुस्लिम धर्मीयांच्या भावना दुखावल्या आहेत. स्थानिक ग्रामस्थांनी अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र समाजकंटकांना अद्याप अटक न झाल्याने मुस्लिम समाजात संताप व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी प्रशासनाने लवकरात लवकर त्यांचा शोध घेऊन त्वरीत अटक करावी, अशी विनंती आहे. यावेळी शहर-ए-खतीब हाफिज हिसामुद्दीन खतीब , वसीम पिरजादा ,एजाज रझा मकरानी, मौलाना सय्यद, आसिफ इक्बाल, मौलाना मेहबूब आलम, मौलाना शमशुद्दीन, मौलाना सय्यद शरीफ, मौलाना इब्राहिम कोकणी, मौलाना मुक्तदीर, अजीज पठाण ,शोएब मेमन ,हाजी शकील शेख, मुख्तार शेख, आबिद रझा, अस्लम खान गुलाम गौस पाटकरी ,इनूस हाजी हनीफ शेख, हनीफ बशीर आदी उपस्थित होते.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

