आनंद अगरवाल / प्रतिनिधि – दक्ष पोलिस वार्ता

अल्पवयीन मुलांच्या हातात वाहन देणे म्हणजे सर्रास स्वतःचा आणि दुसऱ्याचा जीव धोक्यात घालण्याचा प्रकार वाहन जलद गतीने चालवितांना अल्पवयीन मुले- मुले स्वतःच्या जिवाची पर्वा न करता रस्त्यावरून चालणाऱ्या निरापराध लोकांचाही बळी घेतात. या प्रकाराला आळा घालण्यासाठी मुलाने चुकी केल्यास बापाला शिक्षा होऊ शकते. पोलीस प्रशासनाने आता या संदर्भात कारवाईची मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, शिक्षण विभागाचे प्रतिनिधी आणि मुख्याध्यापकांची बैठक झाली. यामध्ये अल्पवयीन मुलांचा हातात वाहने न देण्याबाबत चर्चा करण्यात आली. जिल्ह्यातील हजारो पालक आपल्या पाल्यांची हौस पुरविण्यासाठी त्यांच्या हातात वाहन देतात.
रोड सेफ्टी अर्थात् रस्ता सुरक्षा हा मुद्दा नेहमीच चर्चेचा मुख्य विषय राहिला आहे. जगभरात रस्ते अपघातांमुळे होणाऱ्या मृत्युचं प्रमाण वाढत आहे. भारतातही दरवर्षी सुमारे लाखो व्यक्ती रस्ते अपघातात मरण पावतात. याच पार्श्वभूमीवर अल्पवयीन मुलांच्या हाती वाहने नको यासाठी आम्ही पाऊले उचलली आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी स्कूल बस, रिक्षांना योग्य मर्यादित वाहतूक करता येईल. मात्र अल्पवयीन मुलांच्या हातात वाहने नको यासाठी आम्ही अधिक कठोर पाऊले उचलणार आहेत. लहान मुलांना वाहतुकीच्या नियमांची कल्पना नसते, त्यामुळे त्यांच्याकडून वाहतुकीच्या नियमांचे पालन होण्याची शक्यता फार कमी. या अल्पवयीन मुलामुलींमुळे अपघात होऊन इतरांचा प्राण जाण्याची शक्यता असल्याने आम्ही सुरक्षेच्या दृष्टीने ही पाऊले उचलली आहेत.
– नंदकुमार ठाकूर (पोलीस अधिक्षक, बीड)
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

