आनंद अगरवाल / प्रतिनिधि – दक्ष पोलिस वार्ता

दि.१७/०६/२०२३ रोजी फिर्यादी हे जयभवानी चौक, रामनगर येथील त्यांचे घराचे समोर रोडवर मित्रांसह क्रिकेट खेळत असताना त्यांच्या ओळखीचे किरण गावडे, अविष्कार पवार व सोहम सातव यांनी फिर्यादीस जवळ बोलावून, शिवीगाळ करून, आज तुला आम्ही खल्लासच करतो असे म्हणून त्याचेकडील बंदुक फिर्यादीचे दिशेला रोखल्याने फिर्यादीने सदरची बंदुक हाताने वळविल्याने त्यातील गोळया जमिनीवर फायर झाल्या. त्याचवेळेस अविष्कार पवार याने त्याच्याकडील बंदुकीने फिर्यादीवर फायर केल्याने तेथील लोक सैरावैरा पळू लागले. फिर्यादीवर फायर केलेली त्यातील गोळी फिर्यादीच्या कमरेच्या पाठीमागे डाव्या बाजूस लागून फिर्यादीला जखमी करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला म्हणून त्यांचेविरुध्द वारजे माळवाडी पो.स्टे २४३/२०२३ भा.द.वि. कलम ३०७, ३४, आर्म अॅक्ट कलम ३ (२५), महा. पोलीस अधिनियम कलम ३७ (१) सह १३५,क्रि.लॉ.अमे.का. कलम ७ प्रमाणे गुन्हा नोंद आहे.
दाखल गुन्हयाचा तपास पोलीस उप-निरीक्षक, काळे हे करीत असताना, विधीसंघर्षग्रस्त बालकांकडे त्यांच्या नातेवाईकांसमोर विचारपूस केली असता, त्यांनी सदरचा गुन्हा पुर्ववैमनस्यातून १. ओंकार उर्फ टेडया उमेश सातपुते २.वीर फकीरा युवराज कांबळे यांच्या सांगण्यावरून पुर्वनियोजिटकट रचून केला असल्याचे सांगितले. तपासामध्ये सदर आरोपीनी विधीसंघर्षीत बालकांचा गुन्हयामध्ये वापर करून गुन्हा करण्याकरीता संगनमताने कट रचून गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने दाखल गुन्हयामध्ये भा. दं. वि.क १२० ( ब ) व बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ चे कलम ८३ (२) प्रमाणे कलमवाढ करण्यात आलेली आहे.
त्यामुळे १. ओंकार उर्फ टेडया उमेश सातपुते, वय २३ वर्षे, रा. सनं १३५, यशोदिप सोसायटी, संघर्ष चौक,वारजे माळवाडी, पुणे ( अटक) २. वीर फकीरा युवराज कांबळे, वय २२ वर्षे रा. जिजाई अपार्टमेंट, सरडे बाग, शिवणे, पुणे व इतर ०३ विधीसंघर्षित बालक यांनी केला असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले असून, त्यामधील ओंकार उर्फ टेडया उमेश सातपुते यास अटक करण्यात आलेली असून, इतर विधि संघर्षित बालकांना ताब्यात घेवुन पालंकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. वीर फकीरा युवराज कांबळे हा (पाहिजे आरोपी) आहे.
वर नमूद अटक आरोपी यांचेकडे सखोल तपास केला असता आरोपी नामे ओंकार उर्फ टेडया उमेश सातपुते (टोळी प्रमुख) हा प्रत्येक गुन्हयामध्ये काही सामाईक व काही नवीन साथीदार यांना सोबत घेवून गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने दाखल गुन्हयात मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करणेबाबतचा प्रस्ताव श्री.सुनिल जैतापुरकर,वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वारजे माळवाडी पोलीस स्टेशन,पुणे यांनी मा.पोलीस उप आयुक्त, परि-३ पुणे शहर, श्री. सुहेल शर्मा यांचे मार्फतीने मा.अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे, श्री. प्रविण पाटील यांना सादर केलेला होता. सदर प्रस्तावाची छाननी केल्यानंतर आरोपी नामे ओंकार उर्फ टेडया उमेश सातपुते ( टोळी प्रमुख) याने आपले अधिपत्याखाली प्रत्येक गुन्हयामध्ये काही सामाईक व काही नवीन साथीदार यांना सोबत घेवून गुन्हा केला असल्याचे निष्पन्न झाले आहे.
आरोपी नामे ओंकार उर्फ टेडया उमेश सातपुते (टोळी प्रमुख) याने आपले अधिपत्याखाली प्रत्येक गुन्हयात काही सामाईक व काही नवीन साथीदार यांना सोबत घेवून स्वतःची संघटीत टोळी तयार करून अपराध केलेले असून यातील आरोपी यांनी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, दरोडा, गुन्हा करण्यासाठी कट रचणे,बेकायदेशिर अग्नीशस्त्र जवळ बाळगणे, सर्वसामान्य नागरिकांच्या मनात दहशत निर्माण करणे, बेकायदेशीर जमाव जमविणे, जीवे ठार मारण्याची धमकी देणे, दुखापत करणे, पोलीसांच्या आदेशाचा भंग करणे यासारखे गंभीर गुन्हे वारंवार केले असल्याने दाखल गुन्हयामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम ३ (१) (11), ३(४) या कलमाचा समावेश करणे बाबत मा. अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे, श्री. प्रविणकुमार पाटील यांनी मंजुरी दिलेली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सहा पोलीस आयुक्त, कोथरूड विभाग, पुणे शहर श्री. भिमराव टेळे हे करीत आहेत.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

