आनंद अगरवाल / प्रतिनिधि – दक्ष पोलिस वार्ता

मा. पोलीस आयुक्त सो, श्री. अंकुश शिंदे सो, नाशिक शहर मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ – २ मोनिका राउत सो, मा. सहायक पोलीस आयुक्त श्री. शेखर देशमुख सो, यांनी अंमली पदार्थ साठा व विक्री करणारे यांचा शोध घेवुन त्यांचेवर कारवाई करणे बाबत अंबड पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. प्रमोद वाघ यांना सुचना व मार्गदर्शन केले होते.
अंबड पोलीस ठाणेकडील, गुन्हे शोध पथकाचे अंमलदार पोलीस नाईक २०८९ पवन परदेशी यांना गोपनिय खात्रीशिर बातमी मिळाली की, इसम नामे हेमराज महेन्द्रसिंग गिरासे रा. रो हाऊस नं. १५३, केवल पार्क अंबड लिंक रोड, नाशिक याचे पाटील पार्क येथील नविन बांधकाम इमारती मधिल भाडेनी घेतलेल्या गाळा नं. २ खान्देश ढेप सेन्टर व पशु खादय या दुकानामध्ये गांजा ठेवला आहे. त्याअनुषंगाने अंबड पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री प्रमोद वाघ, पोनि मनोहर कारंडे, गुन्हे शोध पथकाचे पोउनि नाईद शेख, पोहवा ४१३ रविंद्रकुमार पानसरे, पोना १८४८ किरण गायकवाड, पोना २०९८ पवन परदेशी, पोशि २३५९ दिपक शिंदे, पोशि १५६६ सागर जाधव, पोशि २०८३ योगेश सिरसाठ, पोशि २२२९ घनश्याम भोये, पोशि २०९३ राकेश पाटील चा. पोशि १४५५ मोतीराम वाघ अशांनी सापळा रचुन कायदेशीर बाबींची पुर्तता करून आरोपी नामे महेन्द्रसिंग गिरासे व त्याचा भाऊ केतन महेन्द्रसिंग गिरासे दोन्ही रा- रो हाऊस नं. १५३, केवल पार्क अंबड लिंक रोड, नाशिक मुळ रा. मु.पो.नागलवाडी, ता. चोपडा, जि. जळगाव यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडुन एकुण २,२६,९५० रूपयांचा २२ किलो गांजा जप्त करून आरोपीतांविरूध्द गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आले आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री अंकुश शिंदे, मा. पोलीस उप आयुक्त मोनिका राउत, परिमंडळ-०२, सहा पोलीस आयुक्त श्री शेखर देशमुख, अंबड विभाग तसेच अंबड पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री प्रमोद वाघ व पोनि मनोहर कारंडे यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी पोउनि नाईद शेख व गुन्हे शोध पथकाचे अंमलदार पो.ना १८४८ किरण गायकवाड, पो.ना २०९८ परदेशी, पो.शि २६९७ राठोड, पोशि २०५४ करंजे, पो.शि २५४७ समाधान शिंदे, पो.शि २२२९ घनश्याम भोये, पो.शि १५६६ सागर जाधव, पो.शि २०९३ राकेश पाटील यांनी केली असुन गुन्हयाचा पुढील तपास पोउनि संदिप पवार हे करीत आहेत.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

