आनंद अगरवाल/प्रतिनिधि-दक्ष पोलिस वार्ता

घरफोडी चोरीचे एकूण 08 गुन्हे उघडकीस, एकूण 114 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 260 किलो वजनाचे साखर कारखान्याचे स्क्रॅप साहित्य 01 क्वालीस कार व 01 बोलेरो पीकअप वाहनासह एकूण 12,34,937/- रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत.
दिनांक 07/04/2022 रोजीचे 23ः00 वा. ते दिनांक 08/04/2022 रोजी सकाळी 03ः30 वा चे दरम्यान पंढपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील मौजे रोपळे ता. पंढरपूर येथे विलास विशंभर भोसले, रा. रोपळे ता. पंढरपूर जि. सोलापूर यांचे राहते घराचे मुख्य दरवाजाचे कुलुप तोडून घरातील लोखंडी कपाट उचकटून सोन्याचांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 5,49,000 रू. किंमतीचा ऐवज चोरून नेला म्हणून पंढरपूर तालुका पोलीस ठाणे गुरनं 252/2022 भादविक 457, 380 प्रमाणे वरील प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
शिरीष सरदेशपांडे, पोलीस अधिक्षक सोलापूर ग्रामीण व हिंमत जाधव, अपर पोलीस अधिक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांना सोलापूर ग्रामीण जिल्हयातील मालाविषयी गुन्हे उघडकीस आणण्यासाठी मार्गदर्शन व सुचना दिल्या. त्यावरून पोनि निंबाळकर यांनी गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची बैठक घेवून त्यांना मालाविषयी गुन्हे उघडकीस आणणेकामी सुचना केल्या होत्या.
सपोनि शशिकांत शेळके व त्यांचे पथक पंढरपूर शहरात हजर असताना त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, ‘‘मौजे रोपळे ता. पंढरपूर येथील घरफोडी चोरीचा गुन्हा हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार हा त्याचे इतर साथिदारांसोबत केला असून तो क्वालीस कार वाहनासह पंढरपूर शहरातील अहिल्या चौकात थांबलेला आहे.’’ त्यावरून पोलीस पथकाने तेथे सापळा लावून त्यास ताब्यात घेवून कौशल्यपूर्ण तपास करता त्याने उपरोक्त गुन्हा तसेच मागील काही दिवसामध्ये मौजे रोपळे, बाभूळगांव, देगांव, पटवर्धन कुरोली, आढीव इत्यादी ठिकाणी घरफोडी चोरी केल्या असल्याचे सांगितले. तसेच मौजे खर्डी ता. पंढरपूर व आलेगांव ता. माढा येथील साखर कारखाना स्टोअर्सचे गोडावून फोडून साखर कारखान्यातील मशनिरी साहित्य चोरल्याचे सांगितले. त्याचेकडे अधिक कौशल्यपूर्ण तपास करून त्याचेकडून एकूण 08 घरफोडी गुन्हयातील 114 ग्रॅम वजनाचे (6,16,896 रू. किंमतीचे ) सोन्याचे दागिने, 260 किलो साखर कारखान्यातील मशिनरी साहित्य (2,18,041 रू. किंमतीचे) जप्त केली आहे. तसेच त्याचेकडे असलेली क्वालीस कार क्रमांक एम.एच. 12 ए एन 8721 ही देखील चोरीच्या पैशातून घेतलेले किंमत 2,00,000 रू. ची त्याचप्रमाणे चोरीचे गुन्हे करण्यासाठी वापरलेले विना नंबरचे पिकअप जिप किंमत 2,00,000 रू. असा एकूण 12,34,937 /- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरचा आरोपी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याला पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन येथे वर्ग करण्यात आले आहे. तसेच त्याचे विरूध्द सोलापूर व उस्मानाबाद जिल्हयात मालाविषयी गुन्हे दाखल आहेत. सदर गुन्हयांचा तपास चालु असून त्याचेकडून आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. सदर आरोपीतांकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्यांचेकडून खालील नमूद गुन्हे उघडकीस आले आहेत.
अ.क्र. पोलीस ठाणे गुरनं व कलम घटनास्थळ
01) पंढरपुर तालुका गुरनं 252/22 भादवि 457,380 प्रमाणे. रोपळे पंढरपूर.
02 ) पंढरपुर तालुका गुरनं 366/2023 भादवि 380 प्रमाणे. बाभुळगांव पंढरपूर.
03) पंढरपूर तालुका गुरनं 801/2022 भादविक 457, 380 प्रमाणे. बाभुळगांव पंढरपूर
04) पंढरपूर तालुका गुरनं 436/2023 भादविक 457, 380 प्रमाणे. देगांव ता. पंढरपूर जि. सोलापूर
05) करकंब गुरनं 159/2022 भादविक 457, 380 पटवर्धन कुरोली ता. पंढरपूर
06) टेंभूर्णी गुरनं 376/2023 भादविक 457, 380 प्रमाणे. भैरवनाथ षुगर आलेगांव ता. माढा.
07) पंढरपूर तालुका गुरनं 364/2023भादविक 457, 380 प्रमाणे. सिताराम षुगर खर्डी ता. पंढरपूर.
08) पंढरपूर तालुका गुरनं 124/2023 भादविक 457, 380, 511 आढीव ता. पंढरपूर.
सदरची कामगिरी शिरीष सरदेशपांडे, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण, हिंमत जाधव, अपर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली सुरेश निंबाळकर, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा यांचे नेतृत्वाखाली सहा. पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके, सफौ/ ख्वाजा मुजावर, पोलीस अंमलदार नारायण गोलेकर, प्रकाश कारटकर, धनाजी गाडे, मोहन मनसावाले, अनिस शेख, धनराज गायकवाड, अक्षय दळवी, अक्षय डोंगरे, समीर शेख, महिला अंमलदार पल्लवी इंगळे यांनी बजावली आहे.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता
संपर्क :- 98221 17037/98228 17037

