आनंद बंसल/प्रतिनिधि-दक्ष पोलिस वार्ता

सदर बाबत तपास पथकाचे प्रभारी अधिकारी विजय चंदन सहा. पोलीस निरीक्षक विमानतळ पोलीस स्टेशन पुणे शहर यांनी आरोपींचे मोबाईल नंबरचे तांत्रिक विश्लेषण करुन यातील आरोपी नामे शैलेशकुमार हिंगु रा. ४०६, नंदनवन सोसायटी, मातृशक्ती सोसयटी जवळ, पुणगाव सुरत गुजरात राज्य यास तलासरी, पालघर येथे महाराष्ट्रा मधुन गुजरात मध्ये जात असताना, पालघर पोलीसांचे मदतीने सापळा लावुन ताब्यात घेतलेले आहे. नमुद आरोपी याचे कडुन फिर्यादी यांची थार गाडी ताब्यात घेण्यात आलेली आहे. यातील आरोपी नामे शैलेशकुमार हिंगु यांचेवर गावदेवी पोलीस स्टेशन व नवसारी पोलीस स्टेशन, गुजरात येथे दारुबंदी अधिनियम कलम ६५ (ड) प्रमाणे दाखल आहेत. दाखल गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि कदीर देशमुख, विमानतळ पोलीस स्टेशन पुणे शहर हे करीत आहेत.
सदरची कारवाई ही मा.पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. रितेशकुमार, मा. सह पोलीस आयुक्त,पुणे शहर श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, श्री. रंजनकुमार शर्मा मा. पोलीस उपायुक्त परि- ४ पुणे शहर, श्री. शशिकांत बोराटे, मा. सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग पुणे शहर, श्री. संजय पाटील यांचे आदेशान्वये वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विमानतळ पोलीस स्टेशन पुणे शहर श्री. विलास सोंडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती संगीता माळी यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक, विजय चंदन पोलीस उप निरीक्षक रविंद्र ढावरे, पोलीस अंमलदार अविनाश शेवाळे, अंकुश जोगदंडे, दादासाहेब बर्डे, गिरीश नाणेकर, रुपेश पिसाळ, नाना कर्चे, सचिन जाधव, सचिन कदम, योगेश थोपटे, ज्ञानेश्वर आवारी यांचे पथकाने केली आहे.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

