सलीम पटेल / प्रतिनिधी , दक्ष पोलीस वार्ता , नाशिक

माती परीक्षणावर आधारित एकात्मिक अन्नद्रव्ये, सेंद्रिय आणि जिवाणू खताचा अधिकाधिक वापर करून कृषी विद्यापिठाच्या विकसित तंत्रज्ञानाचा शेतकन्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन निफाड येथील कृषीसंशोधन केंद्राचे मृद शास्त्रज्ञ डॉ. योगेश पाटील यांनी
केले.
खंडागळी तालुका सिन्नर येथे आज दि. 19/ 8/ 2022 रोजी आयोजित केलेल्या खरीप पिक उत्पादन वाढ मोहिमे अंतर्गत आयोजित केलेल्या शेतकरी प्रशिक्षण मेळाव्यात ते बोलत होते. कृषी विभागाच्या वतीने सोयाबीन आणि मका पिकाची उत्पदनात वाढ व्हावी. यासाठी आयोजित केलेल्या प्रशिक्षण मेळा्याचे आयोजन केले होते. मेळाव्यास कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी सतीश कोकाटे होते. यावेळी सिन्नर तालुका कृषी अधिकारी आण्णासाहेब गागरे यांनी शासनाच्या विविध योजनांचा आणि सवलतीचा शेतका-यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले.
यावेळी पंचायत समिती कृषि अधिकारी नंदकुमार अहिरे अधिकारी बागुल , कृषी पर्यवेक्षक राजेंद्र दोड़के , माजी सरपंच विलास ठोक , सुभाष गिते , आत्माराम कोकाटे, राजेंद्र कोकाटे, यांच्या सह असंख्य शेतकरी वर्ग उपस्थित होते. कृषी सहाय्यक केवलसिंग पवार यांनी मंडळ कृषी मेळाव्याचे सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता
संपर्क : 9822117037 / 9822817037

