आनंद बंसल/प्रतिनिधि-दक्ष पोलिस वार्ता

पुणे शहरातील विद्यार्थी / विद्यार्थिनी यांनी आपले स्वतःचे अभ्यासावर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे. विद्यार्थिनींना शाळा / महाविद्यालया मध्ये येताना व घरी जाताना रोडरोमिओ चा होणारा त्रास पुर्णपणे आटोक्यात यावा व अशा प्रकारच्या घटना लवकर पोलीसांमध्ये कळाव्या या हेतुने मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री रितेश कुमार यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तालयात निर्भय विद्यार्थी अभियान राबविण्याच्या सुचना प्राप्त झाल्या आहेत.
रोडरोमिओ व टवाळखोरां कडुन मुलींना होणारा त्रास वेळीच पोलीसांना कळविला तर, त्यावर उपाययोजना करुन यामधुन होणा-या संभाव्य गंभीर घटना टाळता येतात. त्यामुळे प्रत्येक शाळा व महाविद्यालय येथे पोलीस स्टेशन मार्फतीने एक नोडल अधिकारी व पोलीस दीदी व पोलीस काका यांना नियुक्त करण्यात आले आहे.
दिनांक १२/०७/२०२३ रोजी लोणीकंद पोलीस स्टेशन चे वतीने लेक्सिकन स्कुल, वाघोली, पुणे येथे पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व शाळा/महाविद्यालयामधील प्राचार्य व शिक्षक यांची बैठक घेण्यात आली. यामध्ये लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री विश्वजित काइंगडे यांनी प्रत्येक शाळा / महाविद्यालय येथे नेमण्यात आलेल्या पोलीस दीदी व पोलीस काका यांची माहिती उपस्थित सर्व प्राचार्य व शिक्षकांना यांना दिली व सदरची माहिती सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचे आवाहन केले. शिक्षकांनी विद्यार्थिनींना होणारा त्रास त्यांनी पोलीसांना लवकर कळवावा याबाबत सजग करण्याविषयी महत्वाचे मुद्दे समजावुन सांगितले. शिक्षकांनी शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेत गेट बाहेर थांबुन टवाळखोर मुले कोणी थांबत आहेत अगर कसे याबाबत पाहणी करुन पोलीसांना याची माहिती सांगणे संदर्भात विनंती केली.
तसेच मा.पोलीस आयुक्त पुणे शहर, श्री. रितेश कुमार यांच्या संकल्पनेतुन व्यसनमुक्ती अभियाना अंतर्गत जी मोहिम राबविण्यात येत आहे. यामध्ये सहभागी होवुन सर्व विद्यार्थ्यापर्यंत व्यसनाचे होणारे भयंकर परिणाम समजावुन सांगण्यासाठी आणि बहुतांश विद्यार्थ्यांना एकत्र करुन पोलीस व व्यसनमुक्ती वर काम करणा-या स्वयंसेवी संस्था यांना पाचारण करुन व्यसनांपासुन होणारे दुष्परिणाम समजावुन सांगणेसाठी सेमिनार आयोजित करणेसंदर्भात आवाहन करण्यात आले. सदर कार्यक्रमास मा.पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. रितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक, मा. सह पोलीस आयुक्त, श्री. रंजनकुमार शर्मा, मा.पोलीस उपायुक्त, श्री. शशिकांत बोराटे, मा. सहाय्यक पोलीस उपायुक्त, श्री. संजय पाटील यांचे मार्गदर्शना खाली लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्रीविश्वजित काइंगडे, पो.नि. (गुन्हे), श्री. मारुती पाटील, पो. नि. (गुन्हे) श्रीमती सीमा ढाकणे हे व लोणीकंद पोलीस ठाण्याचे पोलीस दीदी व पोलीस काका हे हजर होते. लेक्सिकन स्कुलचे श्रीमती. अंजु लुथ्रा, श्रीमती. पेट्रोलिना इट्ज, श्री. अमोल लोखंडे तसेच ७२ शाळा/महाविद्यालयांचे प्राचार्य/शिक्षक हे उपस्थित होते.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

