आनंद बंसल/प्रतिनिधि-दक्ष पोलिस वार्ता

पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, पोलिस हवालदार गायकवाड आणि केकान हे पेट्रोलिंग करत असताना गुळपोळी ते मालवंडी रोडवर चालक विनाक्रमांकाच्या ट्रॉलीतून वाळू घेऊन गुळपोळीच्या दिशेने येत असताना दिसला. पोलिसांनी त्याला अडवून नाव विचारताच युवराज मारुती धर्मे (रा. केवड, ता. माढा) असे सांगितले. पोलिसांनी वाळूच्या रॉयल्टीची पावती विचारल्यानंतर गाडी बाजूला उभी करतो, असे म्हणून वेगाने पुढे निघून गेला. त्याचा पाठलाग करताना दारफळजवळ ट्रॉलीचा पाटा तुटल्याने चालक ट्रॅक्टर जागेवरच सोडून पळून गेला. तालुका पोलिसांनी वाळूसह ट्रॅक्टर हेड जप्त केला आहे.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता
संपर्क :- ९८२२११७०३७/९८२२८१७०३७

