आनंद बंसल / प्रतिनिधि – दक्ष पोलिस वार्ता

गोवा राज्यातून जिल्ह्यात येत असलेल्या विदेशी दारुसह दोन आरोपी व वाहन असा साडेसात लाखाचा मुद्देमाल भूम पोलीसांनी कारवाई करत जप्त केला आहे. ही कारवाई शनिवारी (दि.८) पोलीस निरीक्षक प्रल्हाद सुरवसे यांनी सापळा रचुन केली आहे.
गोवा राज्यातून मराठवाड्यात विदेशी कंपनीची दारू रॉयल स्ट्याग, इंपीरियल ब्ल्यु, म्याकडोल विदेशी दारू परंडा- भूम हद्दीतून बीडकडे रवाना होत असल्याची खबर भूम पोलीसांना मिळाली. यामुळे भूम पोलिसांनी सापळा रचून दोन आरोपींसह माल हस्तगत केला आहे.
माल भूम शहरातच विक्रीसाठी आला असल्याची चर्चा शहरात केली जात आहे. परंतु तपासाअंती ही बाब निष्पन्न होईल. भूम पोलिस ठाणेचे पोलीस निरीक्षक अवघ्या आठ दिवसांमध्ये ठाण्याचा पदभार हाती घेऊन मोठी कारवाई पोलीस निरीक्षक प्रल्हाद सुरवसे यांनी केली. यामुळे त्यांचे सर्व स्तरातून त्यांचे कौतुक केले जात आहे. कारवाई दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत तवार, पोलीस नाईक राकेश पवार, पोलीस व्ही. एच. मलंग्नेर, अजित कवडे आदींसह कर्मचाऱ्यांनी खबर मिळाल्यावरून गाडीसह मुद्देमाल पकडून भूम पोलिसात आरोपी नितीन ठोंबरे, विजय ठोंबरे (रा. केज ता. केज जिल्हा बीड, येथील रहिवासी असणारे विरुद्ध गुन्हा दाखल केला असल्याचे पोलीस निरीक्षक यांनी सांगितले.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता
संपर्क :- ९८२२११७०३७/९८२२८१७०३७

