आनंद बंसल/प्रतिनिधि-दक्ष पोलिस वार्ता

उपलब्ध माहितीनुसार, नाना तुकाराम पवार नावाचे व्यक्ती यांचे वडील तुकाराम मुक्ताजी पवार हे 1986 साली तर त्यांच्या आई छबुबाई या 2003 साली मयत झालेल्या आहेत. त्यांच्या नावावर दिग्रस गावठाण इथे काही जमीन होती त्यांना दोन मुले आणि दोन मुली असे एकूण चार वारसदार होते मात्र वारसदार करण्याची नोंद राहून गेली आणि त्यानंतर आरोपींनी खोटी कागदपत्रे बनवत घोषणापत्र सादर केले आणि त्याच्याआधारे सरकारी कार्यालयात नोंद करून घेतली.
तुकाराम पवार यांना केवळ साखरबाई मुरलीधर पठारे या एकमेव वारस आहेत असे दाखवत भूमी अभिलेख कार्यालय राहुरी येथे नोंद केली आणि ही जमीन प्रमोद रंभाजी गावडे ( राहणार दिग्रस ) याला विकून टाकली . दिग्रसचा माजी सरपंच पोपट बर्डे याने साखरबाई मुरलीधर पठारे हिला ग्रामपंचायतचे सही शिक्क्याचे खोटे कागदपत्र दिले आणि ही नोंद लावण्यास मदत केली.
तालुका दंडाधिकारी यांच्यासमोर सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रावर राजू रावसाहेब भिंगारदे याने देखील ओळख दाखवत खोटी सही केली. सदरप्रकरणी आरोपी योगेश पवार , राजू भिंगारदे , माजी सरपंच पोपट बर्डे , गोरख पवार, बाळू भांड, प्रमोद गावडे ( सर्वजण राहणार डिग्रस ) आणि साखरबाई मुरलीधर पठारे अशा एकूण सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून राजू भिंगारदे आणि योगेश पवार या दोघांना अटक करण्यात आलेली आहे तर चार-पाच जन मात्र अद्याप फरार आहेत.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

