दिनेश गोसावी / संपादक- दक्ष पोलीस वार्ता न्यूज

सांगली येथे १५ व्या राज्यस्तरीय महाराष्ट्र राज्य नौकानयन (कॅनोयिंग व कयाकिंग) अजिंक्यपद स्पर्धेत करंजगाव येथील ईच्छापूर्ती बोट क्लबच्या खेळाडूंची १३ सुवर्णपदकांसह ५१ पदकांची कमाई करत अभुतपूर्व सुयश प्राप्त केले. प्रशिक्षक संतोष इंधे यांच्यासह सुयश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा गोदाकाठ संपर्क कार्यालयात करंजगावचे माजी सरपंच व राज्य बियाणे उपसमितीचे सदस्य खंडू बोडके-पाटील यांच्या हस्ते नुकताच सत्कार करण्यात आला.
करंजगाव येथील ईच्छापूर्ती बोट क्लबच्या १३ खेळाडूंनी या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग घेतला. त्यामध्ये करंजगावची वैष्णवी विजय राजोळे (५ सुवर्ण व ५ रौप्य), ऋतुजा अनिल जोगदंड (४ रौप्य व १ कांस्य), अंकिता अरुण राजोळे (४ रौप्य), समृद्धी संजय चव्हाण (४ रौप्य व १ कांस्य), प्रेम प्रविण राजोळे (२ सुवर्ण व १ रौप्य), सुयोग संजय भगूरे (२ कांस्य), भुसेचा करन आघाव (३ सुवर्ण व ३ रौप्य), म्हाळसाकोरेचा शुभम नागरे (२ सुवर्ण व १ रौप्य), सौरभ नागरे (१ सुवर्ण व १ रौप्य), सोनगावचा अमोल गावले (१ कांस्य), भेंडाळीचा विवेक कापसे (१ रौप्य व ३ कांस्य), औरंगपुरचे कृष्णा खालकर (२ कांस्य), ऋत्विक इंधे (२ कांस्य) या खेळाडूंनी एकूण ५१ पदकांची कमाई केली. त्यांना प्रशिक्षक संतोष इंधे व विशाल डेरले यांनी मार्गदर्शन केले. सत्कारावेळी अनिल जोगदंड, विजय राजोळे, आप्पा राजोळे, संजय लोहकरे, रमजू तांबोळी, हेमंत दिघे आदी उपस्थित होते.
करंजगावची वैष्णवी विजय राजोळे व भूसेचा करण आघाव यांची स्पोर्ट्स एथॉरिटी ऑफ इंडियाच्यावतीने भोपाळ व केरळ येथे प्रशिक्षनासाठी निवड झाल्याने त्यांच्याही सत्कार करंजगाव शिवसेनेच्यावतीने करण्यात आला. पदक प्राप्त सर्व खेळाडूंचे माजी आमदार अनिल कदम, ज्येष्ठ नेते रतन पाटील वडघुले, करंजगाव सरपंच प्रज्ञा नंदू निर्भवने, शालेय समिती अध्यक्ष बाळासाहेब पावशे, सायखेडा शिवसेना गटप्रमुख सागर जाधव, करंजगाव विद्यालय मुख्याध्यापक आर.एन राजोळे आदीनी अभिनंदन केले आहे.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

