हरिश शिंदे किनीस्ते / प्रतिनिधी – दक्ष पोलीस वार्ता

दिनांक २४ जून २०२३ रोजी किनीस्ते येथे जिल्हा परिषद प्राथ. केंद्रशाळा किनीस्ते नूतनीकरण सोहळा पार पडला , जिल्हा परिषद प्राथ.केंद्रशाळा किनीस्ते ही मोखाडा तालुक्यात नावाजलेली अशी ही शाळा परंतु गेल्या काही वर्षात ही शाळा मोडकळीस आली होती सदर बाब स्पार्क फाउंडेशन ठाणे या संस्थेच्या लक्षात येताच सदर संस्थेचे कॉर्डिनेटर पिठोले साहेब यांनी लक्ष घालून या शाळेची दुरुस्ती करून शाळेचा चेहरा बदलवून टाकला .

याच अनुषंगाने आज रोजी या शाळेत नूतनीकरण सोहळा पार पाडला सदर सोहळ्याचे उदघाटन शाळेची माजी विद्यार्थीनी रोहिणी शिंदे हिच्या हस्ते करण्यात आले तर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.चंद्रकांत दाते यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवुन कार्यक्रमाची शोभा वाढवली . सदर कार्यक्रमास मोखाडा तालुक्यातील पदाधिकारी , अधिकारी , केंद्रप्रमुख साहेब तसेच किनीस्ते केंद्रातील शिक्षक व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते या सर्व मान्यवरांनी स्पार्क फाउंडेशन ठाणे यांचे आभार मानून धन्यवाद दिले .
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

