प्रभाकर सेलकंदे / प्रतिनिधी – दक्ष पोलीस वार्ता , मोखाडा
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पहिणे गावाच्या चिखलवाडी येथील सर्वहारा परिवर्तन केंद्राचे वसतिगृह आणि शेजारील रिसाॅर्टवर बुधवारी दिवसभर विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करीत शाळेच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली. संबंधित रिसॉर्ट चालकां विरोधात आंदोलक संतप्त झाल्याने तहसीलदारांनी ते रिसॉर्ट सील केले. या प्रकरणाची मोठ्या प्रमाणात वाच्यता झाल्याने आदिवासी विकास विभागामार्फत समिती नेमण्याचे आदेश देण्यात आले.
वसतिगृहातील मुलींना बळजबरी नाचविल्याचा कथित प्रकार उघड झाल्यानंतर या ठिकाणी वातावरण तापले होते. दुपारच्या सुमारास येथे काही कार्यकर्त्यांनी तोडफोड करत कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली. यावेळेस काही काळ तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर तातडीने पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला. दंगा रोखणारे पथक येथे तैनात करण्यात आल्याने परिसराला छावणीचे स्वरूप आले होते. प्रांताधिकारी रवींद्र ठाकरे यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली. याबाबत त्र्यंबकेश्वर पोलिसांना सूचना दिल्या. आदिवासी विकास विभागामार्फत समीती नेमण्याचे आदेश दिले. त्र्यंबकेश्वरच्या तहसीलदार दिव्या संचेती यांनी जी 7 नेचर पार्क हे विनापरवानगी सुरू असलेले रिसॉर्ट सील केले.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

