सुनिल खुताडे / प्रतिनिधी – दक्ष पोलीस वार्ता , जव्हार

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार अंतर्गत शासकीय माध्यमिक आश्रमशाळा दाभोसा ता.जव्हार जि.पालघर येथे आज दि. १५.०६.२०२३ रोजी शैक्षणिक वर्ष २०२३-२४ च्या पहिल्या दिवसाची सुरुवात अतिशय रोमहर्षक, आनंदात व उत्साहात करण्यात आली.

नवागतांच्या स्वागतासाठी शाळेच्या परिसरात प्रभात फेरी काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी घोषणा दिल्या नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प व चॉकलेट देवून आश्रमशाळा परिवारात त्यांचे स्वागत करण्यात आले. लहानग्यांना आनंद मिळण्याकरिता सेल्फी पॉइंट बनविण्यात आले, तसेच इयत्ता १ ली च्या विद्यार्थ्यांना मा. मुख्याध्यापक, श्री. नंदकिशोर पवार सर यांनी मार्गदर्शन करून शुभेच्छा देवून फुगे आकाशात सोडण्यात आले. त्यातुन विद्यार्थ्यांना शिक्षणाचा सहाय्याने आपल्या आयुष्यात उंच भरारी घेण्याचा एक छानसा संदेश देण्यात आला.
तसेच नवीन प्रवेशित मुलांना मान्यवर पाहुणे यांच्या हस्ते पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आले. प्रवेशोत्स्वासाठी गावचे सरपंच मा. श्रीम. योगिता माडी मॅडम, श्री. नंदकिशोर पवार सर ( मुख्याध्यापक), शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या दिनाचे औचित्य साधून पालक सभा घेण्यात आली. इयत्ता १० वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच शाळा व्यवस्थापन समितीची सभा घेवून आजचा दिवस अतिशय आनंदात व उत्साहात प्रवेशोत्स्व साजरा करण्यात आला, त्या करीता दाभोसा आश्रमशाळेतील सर्व कर्मचारीवृंद यांनी कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता विशेष परिश्रम घेतले.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

