सुमित अग्रवाल / प्रतिनिधी – दक्ष पोलीस वार्ता , पुणे

कर्नाटकातून पुण्याच्या दिशेने अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या टेम्पोसह ७० लाख रुपयांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी दोन जणांना पोलीसांनी अटक केली आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. २६) पुणे ग्रामीण परिसरातील राजगड पोलीसांनी केली आहे.
कर्नाटकातून पुण्याच्या दिशेने अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या टेम्पोसह ७० लाख रुपयांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी दोन जणांना पोलीसांनी अटक केली आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. २६) पुणे ग्रामीण परिसरातील राजगड पोलीसांनी केली आहे.
नामदेव मधुकर लवटे (वय २८, रा. निजामपूर, ता. सांगोला, जि. सोलापूर) आणि चेतन दत्तात्रय खांडेकर (वय १९, रा. निजामपूर, ता. सांगोला, जि. सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक लाल रंगाचा आयशर टेम्पो कर्नाटक राज्यातून गुटखा भरून पुण्याच्या दिशेने येत होता. हा टेम्पो राजगड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आला असता पोलीसांनी चौकशीसाठी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने टेम्पो न थाबवता पुण्याच्या दिशेने पळवला. त्यानंतर पोलीसांनी खेडशिवापुर टोलनाका या ठिकाणी नाकाबंदी करून टेम्पो पकडला.
टेम्पो पकडल्यानंतर चौकशी केली असताना त्यात ७० लाख रुपये किंमतीचा विमल पानमसाला मिळून आला. त्यानंतर पोलीसांनी टेम्पोसह दोन जणांना अटक केली आहे. यामध्ये अटक करण्यात आलेल्या नामदेव आणि चेतनसह शकीर निसारअली मट्टी (रा. विजापूर, राज्य कर्नाटक) आणि सद्दाम मेहबुब कोतवाल (रा. मंगोली, विजापूर, राज्य कर्नाटक) हे दोघेही सामील असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी राजगड पोलीसांनी कलम ३२८, १८८, २७२, २७३, ३४ सह अन्नसुरक्षा कायदया प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास राजगड पोलीस करत आहेत.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

