राजेंद्र कोल्हे/ प्रतिनिधी-दक्ष पोलीस वार्ता,चांदवड

चांदवड शहरात ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य वाढलेले आहे. सर्वत्र कचऱ्याचे ढिगार साचलेले आहेत. येथे खूप मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला आहे. या कचऱ्याच्या ढिगारांत डुक्कर, कुत्रे मरुन पडत आहेत. यामुळे येथे खूप मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली आहे. डासांचा व माशांचा प्रादुर्भाव देखील वाढलेला आहे. यामुळे शहरातील नागरिकांचे व लहान मुलांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. लहान मुले सतत आजारी पडत आहेत. शहरात रोगराई पसरत आहे. शहरात संसर्ग वाढत आहे. नगरपरिषदेकडून शहरात वेळोवेळी साफसफाई करण्यात येत नाही. नागरिकांनी तक्रार करुनही नगरपरिषद याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे. यामुळे शहरातील नागरिकांत अत्यंत संतप्तेचे व तणावाचे वातावरण निर्माण झालेले आहे.
शहरातील सर्व कचरा लवकरात – लवकर साफ करण्यात यावा व शहरात स्वच्छता करण्यात यावी. अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले ), नाशिक जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ आहिरे यांच्या वतीने आमरण उपोषण व तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, यावेळी असा इशारा देण्यात आला. कचऱ्यात उभे राहून आंदोलन करण्यात आले.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

