राजेंद्र कोल्हे/ प्रतिनिधी – दक्ष पोलिस वार्ता चांदवड

चांदवड शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे. हा महामानवाचा पुतळा सर्वांचे श्रद्धास्थान असल्याने येथे दररोज भीम अनुयायी दर्शन घेण्यासाठी येतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी, संविधान दिनी, रमाबाई आंबेडकर जयंती दिनी, स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, बुद्ध पौर्णिमा, महापरिनिर्वाण दिन व शौर्य दिनी येथे हजारो अनुयायी महामानवाला अभिवादन करुन मानवंदना देण्यासाठी येतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी येथुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भव्य मिरवणुक व रथ निघतो. या मिरवणुकीत खूप मोठ्या प्रमाणात लोक, तरुण व महिला सहभागी होतात. येथे वर्षभर अनेक सामाजिक कार्यक्रम देखील आयोजित करण्यात येतात.
यामुळे या परिसराचे सुशोभिकरण करणे अत्यंत गरजेचे आहे. ही नागरिकांची मागणी लक्षात घेता आपल्या स्तरावर योग्य ती कार्यवाही करुन येथे सुशोभिकरण करण्यात यावे, अशी समाज बांधवांची मागणी आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसराचे लवकरात – लवकर सुशोभिकरण व अनुषांगिक कामे कामे करण्यात यावे, ही विनंती करण्यात आली.
यावेळी रवि बनकर, संजय निरभवणे, संजय बनकर, देवा निरभवणे, तुषार अाहिरे, विकी काळे, विकी सुर्यवंशी, रोशन निरभवणे, पंकज निरभवणे, साहेबराव ऐळींजे,बाळू साळवे, कैलास जाधव, दिलीप धिवर, बाळू निरभवणे, अनिल जाधव, रवि निरभवणे, सनी अाहिरे, वसंत जाधव, हर्षद बनकर, संतोष बनकर, प्रवीण भडांगे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

