सागर पाटील/उप संपादक-दक्ष पोलीस वार्ता न्यूज, नाशिक

टायगर ग्रुप संघटना ही युवाशक्तीचा स्वच्छ ग्रुप आहे. तरुणाईमध्ये मोठा जोश जल्लोष असतो. न्यायसनावर बसलो तरी मी पलीकडच्या माणसासाठी आहे. मी समाजसेवक म्हणून कार्यक्रमास आलो आहे. वाल्याचा वाल्मिकी होतो , असा आपला इतिहास आहे. गुन्हा चुकून घडला असेल त्या व्यक्तीची पुनर्स्थापना करायची गरज असल्याचे मत सर्वोच्य न्यायालयाचे न्यायमूर्ती मदन गोसावी यांनी दादासाहेब गायकवाड सभागृह येथे रविवारी (दि.५) टायगर ग्रुप संघटनेच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या कार्यक्रमात माध्यमांसमोर व्यक्त केले.
टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष तानाजी जाधव यांनी सांगितले की, मी नाशिकमध्ये प्रथमच आलो आहे. अखेर पर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाबरोबर टायगर ग्रुप संघटना जाणार नाही. जिल्हाध्यक्ष प्रशांत काळे यांच्या माध्यमातुन नाशिक मध्ये युवकांसाठी मोठे सामाजिक काम करणार आहे. भारतभर संघटना मजबूत करायची आहे. राज्यासह नाशकात रोजगार मेळावा घेऊन युवकांना रोजगार देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. आमचे २ कोटी फॉलोअर्स, २५ लक्ष सदस्य आहे. अखेरपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षासमवेत किंवा कोणालाही पाठिंबा देणार नसल्याचे स्पष्ट करत सर्व सामान्यांची कामे करणार असल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले. नाशिक टायगर ग्रुप जिल्हाध्यक्ष प्रशांत काळे यांनी यापुढेही टायगर ग्रुप १०० टक्के सामाजिक कार्य करणार असल्याचे सांगितले. खा. गोडसे यांनी हे मोठे सामाजिक काम असल्यामुळे कार्यक्रमाला आलो असल्याचे स्पष्ट केले. यावेळी ४ रुग्णवाहिका लोकार्पण, व्हीलचेअरचे वाटप, दीव्यांग बांधवांना स्टिक वाटप आणि ५ आदिवासी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च संघटनेकडून करण्यात येईल . प्रशांत काळे यांच्या उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास आ.देवयानी फरांदे, टायगर ग्रुपचे शहराध्यक्ष अर्जुन काळे, सुनिल फरांदे यांच्यासह राज्यभरातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलीस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

