सागर पाटील/उप संपादक-दक्ष पोलीस वार्ता न्यूज, नाशिक

नाशिकमधून खळबळजनक वृत्त समोर आलं आहे. नाशिकमध्ये एकाच कुटुंबातील तीन सदस्यांनी राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. नाशिकमधील सातपूर परिसरातील अशोक नगर भागातील राधाकृष्ण नगर येथे एकाच कुटुंबातिल तिघांनी गळफास घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
राधाकृष्ण नगर आशापुरी निवास बोलकर पोलीस चौकी समोर राहणारे दीपक शिरोडे, वडील (वय ५५) , मोठा मुलगा प्रसाद शिरोडे (वय २५), राकेश शिरोडे (वय २३) यांनी एकाच घरात तीन वेगवेगवेगळ्या खोलीत गळफास घेत आत्महत्या केली.
रविवारी दुपारी ३ ते साडेतीन च्या दरम्यान घरी कुणीच नसताना हा प्रकर घडला. दीपक शिरोडे हे अशोक नगर बस स्टॉप जवळ फळ विक्री व्यवसाय करतात. दरम्यान पत्नी व आई या ही दुपारी कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या, त्या घरी आल्यावर प्रकार लक्षात आला. मात्र आत्महत्येमागचे नेमकं कारण काय आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
साजिद शेख
मुख्य संपादक – दक्ष पोलिस वार्ता
संपर्क :- 98221 17037 / 98228 17037

